Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money >शेअर बाजार > TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती

TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती

Titan Stock Price: कंपनीच्या शेअर्सनी ५२ आठवड्यांचा आपला नवा उच्चांक प्रस्थापित केला आहे. शेअर बाजारचे 'बिग बुल' मानले जाणारे राकेश झुनझुनवाला यांचा देखील हा आवडता स्टॉक राहिला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2026 15:06 IST2026-04-08T15:06:49+5:302026-04-08T15:06:49+5:30

Titan Stock Price: कंपनीच्या शेअर्सनी ५२ आठवड्यांचा आपला नवा उच्चांक प्रस्थापित केला आहे. शेअर बाजारचे 'बिग बुल' मानले जाणारे राकेश झुनझुनवाला यांचा देखील हा आवडता स्टॉक राहिला आहे.

TATA titan stock surges Rekha Jhunjhunwala wealth increases by Rs 1100 crore in one go | TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती

TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती

Titan Stock Price: टाटा ग्रुपची दिग्गज कंपनी टायटनच्या शेअर्समध्ये बुधवारी मोठी वाढ पाहायला मिळाली. बीएसई (BSE) मध्ये टायटनचे शेअर्स ५ टक्क्यांहून अधिक उसळीसह ४४७० रुपयांवर पोहोचले आहेत. कंपनीच्या शेअर्सनी ५२ आठवड्यांचा आपला नवा उच्चांक प्रस्थापित केला आहे. मार्च २०२६ च्या तिमाहीतील मजबूत बिझनेस अपडेटनंतर टायटनच्या शेअरमध्ये ही मोठी वाढ दिसून आली आहे. या तेजीमुळे दिग्गज गुंतवणूकदाररेखा झुनझुनवाला यांच्या संपत्तीत एका झटक्यात ११०० कोटी रुपयांहून अधिक वाढ झाली आहे. शेअर बाजारचे 'बिग बुल' मानले जाणारे राकेश झुनझुनवाला यांचा देखील टायटन हा आवडता स्टॉक राहिला आहे.

झुनझुनवाला यांच्या संपत्तीत ११२९ कोटींची वाढ

दिग्गज गुंतवणूकदाररेखा झुनझुनवाला यांनी टायटनमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. रेखा झुनझुनवाला यांच्याकडे टायटनचे ४,७१,८४,४७० शेअर्स आहेत. टाटा ग्रुपच्या या कंपनीत झुनझुनवाला यांचा हिस्सा ५.३१ टक्के आहे. मंगळवारी बीएसईमध्ये टायटनचा शेअर ४२३०.७० रुपयांवर बंद झाला होता, तर बुधवारी तो ४४७० रुपयांवर पोहोचला. म्हणजेच एका दिवसात शेअरच्या किमतीत २३९.३० रुपयांची वाढ झाली. या तुफानी तेजीमुळे रेखा झुनझुनवाला यांची नेटवर्थ ११२९ कोटी रुपयांनी वाढली. रेखा झुनझुनवाला या दिवंगत दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांच्या पत्नी आहेत.

२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता

ज्वेलरी सेगमेंटमध्ये ४६ टक्क्यांची मोठी वाढ

टायटन कंपनीच्या घरगुती ज्वेलरी सेगमेंटमध्ये मार्च २०२६ च्या तिमाहीत सुमारे ४६ टक्क्यांची वाढ झाली आहे. 'तनिष्क'नं भारतात ८ नवीन स्टोअर्सची भर घातली असून टायटनचे एकूण रिटेल नेटवर्क ३६०३ स्टोअर्सवर पोहोचले आहे. 'कॅरेटलेन'मध्ये २४ टक्के वाढ दिसून आली. तसंच घड्याळं, आयकेअर आणि उदयोन्मुख व्यवसायांमध्ये अनुक्रमे ७ टक्के, १६ टक्के आणि १७ टक्के वाढ झाली. मात्र, टायटनच्या स्मार्ट वॉच कॅटेगरीमध्ये ५३ टक्क्यांची घसरण झाली आहे. गेल्या वर्षाच्या याच कालावधीच्या तुलनेत टायटनचा एकत्रित कन्झुमर रेव्हेन्यू ४६ टक्क्यांनी वाढलाय. ब्रोकरेज फर्म 'सिटी'ने टायटनच्या शेअर्सना न्यूट्रल रेटिंग दिलं असून ४७५० रुपयांचं टार्गेट ठेवलं आहे.

बोनस शेअर आणि स्टॉक स्प्लिटचा इतिहास

टाटा समूहाच्या या कंपनीनं आपल्या भागधारकांना बोनस शेअरची भेट दिली आहे. टायटननं जून २०११ मध्ये आपल्या गुंतवणूकदारांना १:१ या प्रमाणात बोनस शेअर दिले होते. म्हणजेच प्रत्येक एका शेअरवर एक बोनस शेअर देण्यात आला होता. त्याच वेळी कंपनीनं आपले स्टॉक स्प्लिट केले होते. कंपनीनं १० रुपयांची फेस व्हॅल्यू असलेल्या एका शेअरचे १० भागात विभाजन करुन १-१ रुपये फेस व्हॅल्यूचे १० शेअर्स केले होते. सध्या कंपनीत प्रवर्तकांचा हिस्सा ५२.९० टक्के असून सार्वजनिक भागभांडवल ४७.०२ टक्के आहे.

(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title : टाइटन स्टॉक में उछाल: रेखा झुनझुनवाला की संपत्ति ₹1100 करोड़ बढ़ी।

Web Summary : टाइटन के शेयरों में उछाल, मजबूत बिजनेस अपडेट के बाद 52 सप्ताह का उच्च स्तर। रेखा झुनझुनवाला के निवेश में ₹1100 करोड़ का लाभ। ज्वैलरी सेगमेंट में 46% की वृद्धि। कंपनी का बोनस शेयर और स्टॉक स्प्लिट का इतिहास है।

Web Title : Titan Stock Soars: Rekha Jhunjhunwala's wealth increases by ₹1100 crore.

Web Summary : Titan's shares surged, hitting a 52-week high after strong business updates. Rekha Jhunjhunwala's investment gained ₹1100 crore. Jewellery segment grew by 46%. The company has a history of bonus shares and stock splits.