LG vs Tata Capital IPO: या आठवड्यात टाटा कॅपिटल लिमिटेड आणि एलजी इलेक्ट्रॉनिक्स इंडियाचे दोन मोठे IPO (इनिशियल पब्लिक ऑफरिंग) बाजारात दाखल झाले. गुंतवणूकदार बऱ्याच दिवसांपासून या दोन्ही दिग्गज कंपन्यांच्या आयपीओची वाट पाहत होते. टाटा कॅपिटलचा IPO सोमवारी लॉन्च झाला, तर एलजी इलेक्ट्रॉनिक्सचा IPO मंगळवारी सबस्क्रिप्शनसाठी खुला झाला.
या दोन्ही पब्लिक इश्यूचा आकार १० हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. टाटा कॅपिटलच्या IPO चा आकार १५,५१२ कोटी रुपये आहे, तर एलजी इलेक्ट्रॉनिक्सच्या इश्यूचा आकार ११,६०७ कोटी रुपये आहे.
आता चष्म्याद्वारेही UPI पेमेंट करता येणार; मोबाईल फोनची गरजच भासणार नाही, पाहा डिटेल्स
Tata Capital Vs LG सबस्क्रिप्शन स्टेटस
एलजी इलेक्ट्रॉनिक्सच्या IPO ने संथ सुरुवात केली, पण पहिल्या दिवसाचं बिडिंग बंद होण्यापूर्वी त्यात तेजी दिसून आली आणि तो पूर्णपणे सबस्क्राइब झाला. या IPO साठी उत्साह दिसून येत आहे आणि पहिल्या दिवशी तो १.०४ पट सबस्क्राइब झाला. त्या तुलनेत, टाटा कॅपिटलच्या IPO ला कमी मागणी दिसत आहे. दुसऱ्या दिवसाच्या बोलीपर्यंत तो ७५ टक्के बुक झाला. जाणकारांचं म्हणणं आहे की, टाटा कॅपिटलमध्ये ऑफर फॉर सेल (OFS) असल्यामुळे गुंतवणूकदार थोडा कमी रस दाखवत आहेत.
Tata Capital Vs LG GMP
बुधवारी, टाटा कॅपिटलच्या IPO चा जीएमपी ६ रुपये होता. अशा परिस्थितीत, ३२६ रुपये अपर प्राइस बँड नुसार, त्याची लिस्टिंग ३३२ रुपयांच्या आसपास होण्याची अपेक्षा आहे, जो १.८४% लिस्टिंग गेनचे संकेत देतो. दुसरीकडे, एलजी इलेक्ट्रॉनिक्सचे शेअर्स ग्रे मार्केटमध्ये २९८ रुपयांच्या पातळीवर ट्रेड करत होते. म्हणजेच, त्याचा जीएमपी २९८ रुपये आहे. एलजी इलेक्ट्रॉनिक्सच्या १,१४० रुपये अपर प्राइस बँड नुसार, त्याची लिस्टिंग १,४३८ रुपयांच्या आसपास होऊ शकते.
कुठे गुंतवणूक करावी?
मेहता इक्विटीजचे सीनियर व्हीपी रिसर्च, प्रशांत तापसे यांनी सांगितलं की, टाटा कॅपिटल IPO हा दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी एक उत्कृष्ट संधी आहे. हे देशाच्या वित्तीय सेवा क्षेत्रात टाटा समूहाचे मजबूत ब्रँड व्हॅल्यू, स्केल आणि डायव्हर्सिफिकेशनचा फायदा देतो. कंपनीचा महसूल आणि नफा सतत वाढत आहे. ३२६ रुपये अपर प्राइस बँडवर त्याचं बाजार भांडवल १,३८,३८३ कोटी रुपये आहे. याचं P/B मूल्यांकन ३.२ पट आहे, जे प्रतिस्पर्धी कंपनीपेक्षा उत्तम आहे.
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. यातील तज्ज्ञांची मतं त्यांची वैयक्तिक मतं आहेत. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)