Lokmat Money >शेअर बाजार > १० भागात स्प्लिट झाल्याचा परिणाम, ₹१.१६ लाखांवर मिळाला ₹७.८० लाखांचा रिटर्न; भाव ₹५० पेक्षाही कमी

१० भागात स्प्लिट झाल्याचा परिणाम, ₹१.१६ लाखांवर मिळाला ₹७.८० लाखांचा रिटर्न; भाव ₹५० पेक्षाही कमी

Multibagger Stock:  शेअर बाजारात दीर्घ मुदतीत अनेक कंपन्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा देण्यात यशस्वी ठरल्या आहेत. या कंपनीनंही आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केलंय.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2025 14:32 IST2025-01-10T14:32:20+5:302025-01-10T14:32:20+5:30

Multibagger Stock:  शेअर बाजारात दीर्घ मुदतीत अनेक कंपन्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा देण्यात यशस्वी ठरल्या आहेत. या कंपनीनंही आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केलंय.

sudarshan pharma multibagger stock splitting into 10 parts got a return of rs 7 80 lakhs on rs 1 16 lakhs;Price less than rs 50 | १० भागात स्प्लिट झाल्याचा परिणाम, ₹१.१६ लाखांवर मिळाला ₹७.८० लाखांचा रिटर्न; भाव ₹५० पेक्षाही कमी

१० भागात स्प्लिट झाल्याचा परिणाम, ₹१.१६ लाखांवर मिळाला ₹७.८० लाखांचा रिटर्न; भाव ₹५० पेक्षाही कमी

Multibagger Stock:  शेअर बाजारात दीर्घ मुदतीत अनेक कंपन्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा देण्यात यशस्वी ठरल्या आहेत. सुदर्शन फार्मा इंडस्ट्रीज त्यापैकीच एक. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये कंपनीच्या शेअर्सची विभागणी करण्यात आली होती. ५ नोव्हेंबर २०२४ रोजी शेअर बाजारात ही कंपनी एक्स-स्प्लिट झाली होती. ज्यामुळे कंपनीच्या शेअर्सची फेस व्हॅल्यू १० रुपयांवरून १ रुपयांपर्यंत खाली आली. शुक्रवारी कंपनीच्या शेअर्सच्या किंमतीत २ टक्क्यांची घसरण झाली.

मार्च २०२३ मध्ये आलेला आयपीओ

सुदर्शन फार्माचा आयपीओ गेल्या वर्षी मार्चमध्ये आला होता. कंपनीचा आयपीओ ९ मार्च २०२३ रोजी खुला झाला. या आयपीओची लॉट साइज कंपनीनं १६०० शेअर्स ठेवली होता. त्यामुळे गुंतवणूकदारांना त्यावेळी किमान १ लाख १६ हजार ८०० रुपयांची गुंतवणूक करावी लागली होती. शेअर्स स्प्लिटनंतर पोझिशनल गुंतवणूकदारांकडे असलेल्या एकूण शेअर्सची संख्या १६,००० शेअर्सवर पोहोचली आहे.

शेअरची स्थिती काय?

शुक्रवारी बीएसईवर कंपनीच्या शेअरचा भाव ४८.८० रुपये प्रति शेअर होता. त्यानुसार पाहिलं तर कंपनीने जवळपास १ वर्षात १.१६ लाखांच्या गुंतवणूकीचं मूल्य ७.८० लाख रुपये केलंय. म्हणजेच गुंतवणूकदारांना जवळपास ७ पट नफा झालाय.

कंपनीचा ५२ आठवड्यांचा उच्चांक ५३.५० रुपये आणि ५२ आठवड्यांचा नीचांकी स्तर ५.८२ रुपये प्रति शेअर आहे. कंपनीचं मार्केट कॅप ११७४.४२ कोटी रुपये आहे.

(टीप : यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: sudarshan pharma multibagger stock splitting into 10 parts got a return of rs 7 80 lakhs on rs 1 16 lakhs;Price less than rs 50

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.