Share Market Today: आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजाराची सुरुवात तेजीसह झाली. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्समध्ये ५०० अंकांची, तर निफ्टीमध्ये सुमारे १५० अंकांची वाढ दिसून आली आणि निफ्टी २३,९४० च्या आसपास व्यवहार करत होता. यादरम्यान बँक निफ्टी ७०० अंकांनी वधारून ५५,५०० च्या पातळीवर होता. पीएसयू (PSU) बँक इंडेक्समध्ये १ टक्क्यांहून अधिक तेजी असल्याने बँक निफ्टीला भक्कम पाठबळ मिळत होतं. याशिवाय रियल्टी, ऑटो आणि NBFC इंडेक्समध्येही १-१ टक्क्यांहून अधिक वाढ झाली होती.
आयटी इंडेक्समध्ये १ टक्क्यांहून अधिक घसरण पाहायला मिळाली. विप्रो वगळता इतर सर्व मोठे शेअर्स रेड झोनमध्ये होते. मेटल आणि हेल्थकेअर इंडेक्समध्येही घसरण नोंदवण्यात आली, तर इंडिया VIX ३.५% नं खाली होता.
बाजार उघडण्यापूर्वी जागतिक आणि देशांतर्गत संकेत संमिश्र दिसत होते. एकीकडे अमेरिका-इराण चर्चेमुळे आशेचा किरण दिसत आहे, तर दुसरीकडे कच्च्या तेलाच्या किमतीतील वाढ चिंता वाढवत आहे. GIFT निफ्टीमध्ये थोडी मजबूती दिसत आहे, तर अमेरिकन फ्युचर्स आज येणाऱ्या महागाईच्या आकडेवारीपूर्वी सुस्त दिसत आहेत. याव्यतिरिक्त, निकालांचा हंगाम आणि कॉर्पोरेट बातम्यांवरही बाजारचं लक्ष असेल.
टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
युद्धविराम चर्चेवर बाजाराचे लक्ष
आज अमेरिका आणि इराण यांच्यात युद्ध संपवण्याबाबत महत्त्वाची चर्चा होणार आहे. त्याचबरोबर इस्रायल देखील लेबनॉनसोबत युद्धविरामावर चर्चा करण्यास तयार आहे. या घडामोडींमुळे मध्य पूर्वेतील तणाव कमी होऊ शकतो, ज्यामुळे बाजारला दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
कच्च्या तेलाच्या किमतीत पुन्हा वाढ
ब्रेंट क्रूड सुमारे २% नी वधारून ९७ डॉलर प्रति बॅरलच्या जवळ पोहोचलं. अबू धाबीच्या मते, हॉर्मुज सामुद्रधुनीतून जाण्यासाठी अजूनही इराणची मंजुरी आवश्यक आहे, ज्यामुळे पुरवठ्याबाबत अनिश्चितता कायम आहे.
