Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money >शेअर बाजार > Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले

Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले

Stock Markets Today: मंगळवारी निफ्टीच्या वीकली एक्सपायरीच्या दिवशी भारतीय शेअर बाजाराची सुरुवात मोठ्या घसरणीसह झाली. यामुळे गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या तेजीला लगाम लागला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2026 09:53 IST2026-04-07T09:53:43+5:302026-04-07T09:53:43+5:30

Stock Markets Today: मंगळवारी निफ्टीच्या वीकली एक्सपायरीच्या दिवशी भारतीय शेअर बाजाराची सुरुवात मोठ्या घसरणीसह झाली. यामुळे गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या तेजीला लगाम लागला आहे.

Stock Markets Today Sensex drops 750 points Nifty falls 200 points Auto Realty index falls 1 1 percent | Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले

Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले

Stock Markets Today: मंगळवारी निफ्टीच्या वीकली एक्सपायरीच्या दिवशी भारतीय शेअर बाजाराची सुरुवात मोठ्या घसरणीसह झाली. यामुळे गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या तेजीला लगाम लागला आहे. बाजार उघडताच सेन्सेक्स ७५० अंकांनी तर निफ्टी २०० हून अधिक अंकांनी कोसळला होता. बँक निफ्टीमध्येही ५०० अंकांची घसरण पाहायला मिळाली. बाजारातील अस्थिरता दर्शवणारा इंडिया VIX १.८ टक्क्यांनी वधारला. ऑटो आणि रिअल्टी निर्देशांक प्रत्येकी १ टक्क्यानं घसरल्यानं इतर सर्व क्षेत्रीय निर्देशांक देखील रेड झोनमध्ये व्यवहार करत होते.

सकाळी साडे नऊच्या सुमारास सेन्सेक्स २५० अंकांनी घसरून ७३,८५६ वर व्यवहार करत होता. यादरम्यान निफ्टी ८३ अंकांनी घसरून २२,८८० वर आणि बँक निफ्टी ४०३ अंकांनी घसरून ५२,२०१ वर होता. मिडकॅप १०० निर्देशांक २४२ अंकांनी खाली होता, तर स्मॉलकॅप निर्देशांक ३६ अंकांच्या वाढीसह व्यवहार करत होता.

आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा

आजचे टॉप गेनर्स आणि लूजर्स

निफ्टी ५० वर 'Hindalco' आणि 'Wipro' चे शेअर्स प्रत्येकी १ टक्क्याच्या वाढीसह ग्रीन झोनमध्ये व्यवहार करत होते. दुसरीकडे Jio Financial, Eternal, SBI, Eicher Motors, BEL, Kotak Bank, Reliance, HDFC Bank आणि TMPV हे आजचे प्रमुख घसरलेले शेअर्स ठरले.

जागतिक संकेत आणि तणावाचं वातावरण

जागतिक बाजारातून मिळणारे संकेत संमिश्र असले तरी तणावपूर्ण आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेल्या नवीन डेडलाइनमुळे भू-राजकीय तणाव वाढला आहे. तसंच विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांची (FIIs) सततची विक्री बाजारावर दबाव निर्माण करत आहे. जरी देशांतर्गत फंड्सची खरेदी आणि अमेरिकन बाजारातील मजबुतीमुळे काहीसा दिलासा मिळत असला, तरी आजचं कामकाजाचं सत्र अत्यंत अस्थिर राहण्याची शक्यता आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांची नवीन डेडलाइन आणि इशारा

राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी पत्रकार परिषदेत इराणला मंगळवारी रात्री ८ वाजेपर्यंत करार करण्याची अंतिम मुदत दिलीये. जर करार झाला नाही, तर चार तासांच्या आत इराणचे पॉवर प्लांट आणि पुलांना लक्ष्य केलं जाईल, असं त्यांनी स्पष्टपणे बजावलं. यासोबतच 'स्ट्रेट ऑफ हॉर्मुज'बाबतही त्यांनी कडक भूमिका घेतली असून, तिथे आता अमेरिका टोल वसूल करेल असं म्हटलंय. या घडामोडींमुळे जागतिक बाजारपेठेत चिंतेचं वातावरण आहे. 

Web Title : सेंसेक्स 750 अंक गिरा; वैश्विक तनाव के बीच निफ्टी 200 अंक नीचे

Web Summary : भू-राजनीतिक तनाव और एफआईआई की बिक्री के कारण भारतीय शेयर बाजार में गिरावट आई। सेंसेक्स 750 अंक और निफ्टी 200 अंक गिरा। ऑटो और रियलिटी सेक्टर में नुकसान हुआ। ट्रंप की ईरान डेडलाइन ने बाजार अस्थिरता बढ़ाई, घरेलू फंड गतिविधि पर असर डाला।

Web Title : Sensex Plunges 750 Points; Nifty Down 200 Amid Global Tensions

Web Summary : Indian stock markets faced a sharp decline, triggered by geopolitical tensions and FII selling. Sensex fell by 750 points, Nifty dropped 200. Auto and realty sectors saw significant losses. Trump's Iran deadline further fueled market instability, overshadowing positive domestic fund activity.