Stock Markets Today: भारतीय शेअर बाजाराची सुरुवात गुरुवारी निफ्टीच्या वीकसी एक्सपायरीच्या दिवशी बाजारात तेजीसह झाली आहे. सेन्सेक्स २०० अंकांनी वधारला होता. निफ्टीही ४० अंकांनी वधारला. बँक निफ्टीमध्ये आज काहीशी सुस्ती दिसली. एनएसईवर आयटी, मेटल, फार्मा आणि ऑटो शेअर्समध्ये खरेदी दिसून आली. टाटा मोटर्स, श्रीराम फायनान्स, पॉवरग्रिड या कंपन्यांच्या समभागांमध्ये तेजी दिसून आली.
काल अमेरिकेच्या बाजारात नवा उच्चांक निर्माण होताना दिसला. व्हिएतनाम-अमेरिका व्यापार करारानंतर अमेरिकेच्या बाजारानं पुन्हा उच्चांक गाठला. चार दिवसांच्या तेजीवर एस अँड पी अर्धा टक्का, नॅसडॅक २०० अंकांनी वधारून आतापर्यंतच्या उच्चांकी पातळीवर आणि डाऊ १० अंकांनी वधारून बंद झाला. गिफ्ट निफ्टी आज सकाळी २५५५० च्या वर फ्लॅट होता. जूनच्या रोजगाराच्या आकडेवारीपूर्वी डाऊ फ्युचर्स मंदावले होते. त्याचवेळी निक्केईमध्ये किरकोळ तेजी दिसली. एफआयआयनं सलग तिसऱ्या दिवशी २,९०० कोटी रुपयांच्या शेअर्सची विक्री केली आणि देशांतर्गत फंडांनी ३ हजार कोटींच्या शेअर्सची खरेदी केली.
सिबिल स्कोअर खराब होता, स्टेट बँकेनं नोकरीच दिली नाही; कोर्टानंही म्हटलं, "पैशांच्या बाबतीत..."
जागतिक बाजारपेठेबद्दल बोलायचं झालं तर अमेरिकेनं चीनला चिप डिझाइन निर्यातीवरील बंदी उठवली आहे. अमेरिका आणि चीन यांच्यातील नव्या व्यापार करारानुसार हा निर्णय घेण्यात आलाय. इराणवरील वाढत्या तणावामुळे कच्च्या तेलाचा भाव ३ टक्क्यांनी वाढून ६९ डॉलर झाला आहे. सोनं ३३५० डॉलरच्या जवळ, तर चांदी एक टक्क्यानं वधारून बंद झाली. इराण यापुढे संयुक्त राष्ट्रांच्या आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सीला आपल्या अणुप्रकल्पांची चौकशी करू देणार नाही. राष्ट्रपतींच्या संमतीनं हा कायदा संमत करण्यात आला. या संघटनेवर पाश्चिमात्य देशांची बाजू घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे.