जर तुम्ही आरडी म्हणजेच रिकरिंग डिपॉझिट करण्याचा विचार करत असाल तर पोस्ट ऑफिसची आरडी हा चांगला पर्याय आहे.
केंद्र सरकारनं जुलै-सप्टेंबरसाठी लघु बचत योजनांच्या व्याजदरात कोणताही बदल केलेला नाही. म्हणजेच, तुम्हाला पूर्वीसारखेच व्याज मिळत राहील.
अशा परिस्थितीत, जर तुम्ही आरडी म्हणजेच रिकरिंग डिपॉझिट करण्याचा विचार करत असाल तर पोस्ट ऑफिसची आरडी हा पर्याय आहे. सध्या आरडीवर ६.७० टक्के वार्षिक व्याज मिळत आहे.
५ वर्षांसाठी दरमहा २ हजार रुपये जमा करून, तुम्ही १ लाख ४३ हजार रुपयांचा एकरकमी निधी तयार करू शकता.
तुम्ही या आरडीमध्ये दरमहा १ हजार रुपये गुंतवले तर ५ वर्षांनी मॅच्युरिटीनंतर ६.७ टक्के वार्षिक व्याजदरानं त्याचे अंदाजे ७१ हजार रुपये होतात.
आरडीवर कर्जाची सुविधादेखील उपलब्ध आहे. म्हणजेच, तुम्हाला या दरम्यान पैशांची आवश्यकता असेल तर तुम्ही आरडी न मोडता त्यावर कर्ज घेऊ शकता.
पाच वर्षांच्या आरडीमध्ये सतत १२ हप्ते जमा केले तर तुम्ही कर्ज सुविधा घेऊ शकता. एका वर्षानंतर तुमच्या खात्यात जमा रकमेच्या ५० टक्केपर्यंत कर्ज घेऊ शकता.