Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money >शेअर बाजार > शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स ४५०, तर निफ्टी १६० अंकांनी घसरला, मेटल शेअर्समध्ये विक्री

शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स ४५०, तर निफ्टी १६० अंकांनी घसरला, मेटल शेअर्समध्ये विक्री

Stock Markets Today: अर्थसंकल्पापूर्वी आज देशांतर्गत शेअर बाजाराचं शेवटचे ट्रेडिंग सत्र असून, बाजाराची सुरुवात मोठ्या घसरणीनं झाली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2026 10:14 IST2026-01-30T10:13:51+5:302026-01-30T10:14:26+5:30

Stock Markets Today: अर्थसंकल्पापूर्वी आज देशांतर्गत शेअर बाजाराचं शेवटचे ट्रेडिंग सत्र असून, बाजाराची सुरुवात मोठ्या घसरणीनं झाली आहे.

Stock Markets Today last session before union budget 2026 starts with a decline Sensex falls 450 points Nifty falls 160 points selling in metal shares | शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स ४५०, तर निफ्टी १६० अंकांनी घसरला, मेटल शेअर्समध्ये विक्री

शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स ४५०, तर निफ्टी १६० अंकांनी घसरला, मेटल शेअर्समध्ये विक्री

Stock Markets Today: अर्थसंकल्पापूर्वी आज देशांतर्गत शेअर बाजाराचं शेवटचे ट्रेडिंग सत्र असून, बाजाराची सुरुवात मोठ्या घसरणीनं झाली आहे. सेन्सेक्स ४५० अंकांनी घसरून ८२,१०९ च्या आसपास, तर निफ्टी १६० अंकांनी घसरून २५,२५० वर उघडला. बँक निफ्टीमध्येही २२८ अंकांची घसरण पाहायला मिळाली. मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकात आज मोठी विक्री दिसून आली. मेटल इंडेक्स ३% पेक्षा जास्त, तर आयटी इंडेक्स १% नं घसरला आहे. बाजारातील अस्थिरता दर्शवणारा 'इंडिया व्हीआयएक्स' (India VIX) ३.५५% नं वाढलाय.

कोणते शेअर्स चर्चेत?

हिंदाल्को ५% घसरणीसह निफ्टीचा 'टॉप लूजर' ठरला. याशिवाय टाटा स्टील, जेएसडब्ल्यू स्टील, कोल इंडिया, एचसीएल टेक, इन्फोसिस आणि ओएनजीसीमध्ये मोठी घसरण झाली. दुसरीकडे, एफएमसीजी (FMCG) शेअर्सनी चांगली कामगिरी केली. नेस्ले इंडिया, मारुती सुझुकी, अपोलो हॉस्पिटल, आयटीसी, एशियन पेंट, एचयूएल, इंडिगो, टायटन आणि टाटा कन्झ्युमर हे आजचे 'टॉप गेनर्स' ठरलेत.

जागतिक बाजाराचे संकेत आणि रुपयाची स्थिती

मागील बंदच्या तुलनेत सेन्सेक्स ६१९ अंकांनी खाली ८१,९४७ वर उघडला, तर निफ्टी १७१ अंकांनी खाली २५,२४७ वर उघडला. दुसरीकडे, रुपया ४ पैशांनी वधारून ९१.९१/ डॉलर्स वर उघडला. आशियाई बाजारातील संकेतही कमकुवत आहेत. गिफ्ट निफ्टी (GIFT Nifty) सुमारे १४० अंकांनी घसरला असून निक्केईमध्येही मोठी घसरण झाली आहे. अमेरिकन बाजारातील चढ-उतार आणि एफआयआयची (FIIs) विक्री यांचा परिणाम आजच्या बाजारावर स्पष्टपणे जाणवत आहे.

कमोडिटी मार्केट आणि अमेरिकन बाजारातील अस्थिरता

कमोडिटी मार्केटमध्ये सोने-चांदी आणि कॉपरनं नवीन विक्रम प्रस्थापित केले आहेत, मात्र कच्च्या तेलाच्या किमतीत झालेल्या वाढीनं चिंता वाढवली आहे. अमेरिकन बाजारात जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळाली; डाओ केवळ ५५ अंकांच्या किरकोळ वाढीसह बंद झाला. सलग सहा दिवसांच्या तेजीनंतर नॅस्डॅक (Nasdaq) १७० अंकांनी घसरला. या सर्व घडामोडींमुळे गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या शेअर बाजारातील तेजीला आज ब्रेक लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Web Title : शेयर बाजार में गिरावट; सेंसेक्स, निफ्टी में गिरावट; मेटल शेयरों की बिक्री

Web Summary : बजट से पहले, भारतीय शेयर बाजार गिरावट के साथ खुले। सेंसेक्स 450 अंक और निफ्टी 160 अंक गिरा। मेटल शेयरों में भारी बिकवाली हुई। हिंडाल्को सबसे बड़ा नुकसान वाला शेयर रहा, जबकि एफएमसीजी शेयरों में तेजी आई। वैश्विक संकेतों का बाजार पर असर पड़ा। कमोडिटी बाजार की अस्थिरता और कच्चे तेल की बढ़ती कीमतें चिंता बढ़ा रही हैं।

Web Title : Share Market Plunges; Sensex, Nifty Fall; Metal Stocks Sell-Off

Web Summary : Ahead of the budget, Indian stock markets opened sharply lower. Sensex fell 450 points, Nifty 160. Metal stocks saw heavy selling. Hindalco was the top loser, while FMCG shares gained. Global cues are weak, impacting the market. Commodity market volatility and rising crude oil prices add to concerns.