Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money >शेअर बाजार > Stock Markets Today: मोठ्या घसरणीसह शेअर बाजार उघडला, सेन्सेक्स ६४७ अंकांनी घसरला; रुपयाचंही ऐतिहासिक पतन

Stock Markets Today: मोठ्या घसरणीसह शेअर बाजार उघडला, सेन्सेक्स ६४७ अंकांनी घसरला; रुपयाचंही ऐतिहासिक पतन

Stock Markets Today: जागतिक संकेतांच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी देशांतर्गत बाजारपेठेनं मोठ्या घसरणीसह व्यवहाराची सुरुवात केली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2026 10:17 IST2026-03-27T10:17:16+5:302026-03-27T10:17:16+5:30

Stock Markets Today: जागतिक संकेतांच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी देशांतर्गत बाजारपेठेनं मोठ्या घसरणीसह व्यवहाराची सुरुवात केली.

Stock Markets Today 27 march 2026 Stock market opens with a big decline Sensex falls by 647 points Rupee also sees historic fall | Stock Markets Today: मोठ्या घसरणीसह शेअर बाजार उघडला, सेन्सेक्स ६४७ अंकांनी घसरला; रुपयाचंही ऐतिहासिक पतन

Stock Markets Today: मोठ्या घसरणीसह शेअर बाजार उघडला, सेन्सेक्स ६४७ अंकांनी घसरला; रुपयाचंही ऐतिहासिक पतन

Stock Markets Today: जागतिक संकेतांच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी देशांतर्गत बाजारपेठेनं मोठ्या घसरणीसह व्यवहाराची सुरुवात केली. सकाळी बाजार उघडताना, म्हणजेच ९ वाजून १५ मिनिटांनी बीएसई (BSE) सेन्सेक्स ६४६.५९ अंकांनी घसरून ७४,६२६.८६ च्या पातळीवर व्यवहार करत होता. त्याच वेळी, एनएसई (NSE) निफ्टी १९४.०५ अंकांनी घसरुन २३,११२.४० च्या पातळीवर होता. 

आज निफ्टीमध्ये सर्वाधिक वाढ झालेल्या कंपन्यांमध्ये टीसीएस, एचसीएल टेक्नॉलॉजीज, इन्फोसिस, कोल इंडिया आणि ओएनजीसी यांचा समावेश होता. दुसरीकडे, टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेइकल्स, श्रीराम फायनान्स, बजाज फायनान्स, एल अँड टी आणि इंटरग्लोब एव्हिएशन या कंपन्यांना नुकसानीचा सामना करावा लागला.

केंद्राचा मोठा निर्णय! पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात, पाहा नवे दर; स्वस्त होणार का इंधन?

आयटी क्षेत्र वगळता सर्व क्षेत्रांचे निर्देशांक खाली

क्षेत्रनिहाय कामगिरीचा विचार केल्यास, आयटी (IT) क्षेत्र वगळता इतर सर्व क्षेत्रांचे निर्देशांक घसरणीसह व्यवहार करत आहेत. ऑटो, पीएसयू बँक, कॅपिटल गुड्स, एफएमसीजी, रियल्टी आणि इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रात १ ते २ टक्क्यांची घसरण पाहायला मिळाली. निफ्टी मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकातही सुमारे १ टक्क्यांची घट नोंदवण्यात आली आहे.

रुपया डॉलरच्या तुलनेत ९४ च्या पार

शुक्रवार, २७ मार्च रोजी भारतीय रुपया डॉलरच्या तुलनेत ९४ रुपयांच्या पातळीवर गेला असून त्याने आतापर्यंतचा नवा नीचांकी स्तर गाठला आहे. मध्य-पूर्वेत सुरू असलेल्या संघर्षामुळे निर्माण झालेले ऊर्जा पुरवठा संकट हे याचं मुख्य कारण मानलं जात आहे, ज्याचा दबाव भारतासारख्या ऊर्जा आयात करणाऱ्या देशांवर वाढत आहे. या काळात रुपया ९४.१५७५ प्रति डॉलरपर्यंत घसरला, जो या आठवड्याच्या सुरुवातीला नोंदवलेल्या ९३.९८ या विक्रमी नीचांकापेक्षाही खाली आहे. गेल्या महिन्याच्या अखेरीस संघर्ष सुरू झाल्यापासून भारतीय चलनात सुमारे ३.५ टक्क्यांची घसरण दिसून आली.

Web Title : शेयर बाजार बड़ी गिरावट के साथ खुला; रुपया रिकॉर्ड निचले स्तर पर।

Web Summary : वैश्विक संकेतों के बाद भारतीय शेयर बाजार में भारी गिरावट आई। सेंसेक्स 647 अंक गिरा, और निफ्टी में भी गिरावट देखी गई। आईटी क्षेत्र एक अपवाद था। मध्य पूर्व तनाव के कारण रुपया डॉलर के मुकाबले ₹94 तक गिर गया।

Web Title : Stock market opens with sharp fall; Rupee hits record low.

Web Summary : Indian stock market sharply declined following global cues. Sensex fell by 647 points, and Nifty also saw a significant drop. IT sector was an exception. Rupee plummeted to ₹94 against the dollar due to Middle East tensions.