Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money >शेअर बाजार > Stock Markets Down: शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण; Sensex ६०० अंकांनी आपटला; IT, Auto स्टॉक्समध्ये विक्री

Stock Markets Down: शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण; Sensex ६०० अंकांनी आपटला; IT, Auto स्टॉक्समध्ये विक्री

Stock Markets Down: घरगुती शेअर बाजारात आज आठवड्याच्या शेवटच्या दिवशीही मोठ्या विक्रीसह व्यवहाराची सुरुवात झाली. बाजार उघडताच सेन्सेक्स ६०० अंकांच्या घसरणीसह व्यवहार करताना दिसला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2026 09:47 IST2026-03-13T09:47:46+5:302026-03-13T09:47:46+5:30

Stock Markets Down: घरगुती शेअर बाजारात आज आठवड्याच्या शेवटच्या दिवशीही मोठ्या विक्रीसह व्यवहाराची सुरुवात झाली. बाजार उघडताच सेन्सेक्स ६०० अंकांच्या घसरणीसह व्यवहार करताना दिसला.

Stock Markets Down sees big fall for second consecutive day Sensex falls by 600 points IT Auto stocks sell off | Stock Markets Down: शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण; Sensex ६०० अंकांनी आपटला; IT, Auto स्टॉक्समध्ये विक्री

Stock Markets Down: शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण; Sensex ६०० अंकांनी आपटला; IT, Auto स्टॉक्समध्ये विक्री

Stock Markets Down: घरगुती शेअर बाजारात आज आठवड्याच्या शेवटच्या दिवशीही मोठ्या विक्रीसह व्यवहाराची सुरुवात झाली. बाजार उघडताच सेन्सेक्स ६०० अंकांच्या घसरणीसह व्यवहार करताना दिसला. निफ्टीदेखील १८० अंकांच्या घसरणीसह २३,५०० च्या खाली आला होता. बँक निफ्टी ५०० हून अधिक अंकांनी घसरून ५४,५०० च्या आसपास होता, तर India VIX मध्ये १.४% ची वाढ नोंदवण्यात आली. मिडकॅप आणि स्मॉलकॅप इंडेक्समध्येही प्रत्येकी १-१ टक्क्यांची घसरण पाहायला मिळत होती.

सकाळी ९:२८ वाजता सेन्सेक्स ५६६ अंकांनी घसरून ७५,४६७ वर, तर निफ्टी १७० अंकांनी घसरून २३,४६६ वर व्यवहार करत होता. बँक निफ्टी ५८४ अंकांनी घसरून ५४,५३५ वर आला होता.

सरकार म्हणतं एलपीजी कमतरताच नाही, दुसरीकडे बाजारातून इंडक्शनही होताहेत गायब; नक्की चाललंय काय?

प्रमुख शेअर्सची स्थिती

आजच्या घसरणीच्या वातावरणात केवळ FMCG क्षेत्रातील शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळाली. निफ्टी ५० मधील टॉप गेनर्समध्ये HUL, नेस्ले, पॉवर ग्रिड, आयटीसी, सन फार्मा, बजाज फायनान्स, टाटा कंझ्युमर, भारती एअरटेल आणि एनटीपीसी यांसारख्या शेअर्सचा समावेश होता.

दुसरीकडे, हिंदाल्को, एल अँड टी, टाटा स्टील, अल्ट्राटेक सिमेंट, टेक महिंद्रा आणि इंडिगो या शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण झाली. मेटल, आयटी, मीडिया, पीएसयू बँक आणि प्रायव्हेट बँक इंडेक्समध्ये मोठी घसरण दिसून आली, तर एफएमसीजी हा एकमेव इंडेक्स ग्रीन झोनमध्ये होता.

घसरणीमागची कारणं काय?

जागतिक तणाव आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींयामुळे बाजारासमोर अनेक आव्हाने उभी आहेत. पश्चिम आशियातील बिघडत चाललेल्या परिस्थितीचा थेट परिणाम कमोडिटी मार्केट, जागतिक इक्विटी आणि चलन बाजारावर होत आहे. यासोबतच परदेशी गुंतवणूकदारांकडून (FIIs) होत असलेली सलग विक्री आणि महागाईची आकडेवारी यामुळे बाजारातील गुंतवणुकीचे वातावरण कमकुवत झालंय. आजच्या व्यवहारादरम्यान या प्रमुख घटकांकडे गुंतवणूकदारांचे बारीक लक्ष असेल. 

Web Title : शेयर बाजार लगातार दूसरे दिन गिरा; सेंसेक्स 600 अंक लुढ़का।

Web Summary : भारतीय शेयर बाजार गिरावट के साथ खुले, सेंसेक्स 600 अंक नीचे। निफ्टी 23,500 से नीचे गिरा। वैश्विक तनाव और बढ़ते कच्चे तेल की कीमतों के बीच आईटी और ऑटो शेयरों में भारी बिकवाली देखी गई, जिससे निवेशकों की धारणा कमजोर हुई।

Web Title : Stock markets crash for second day; Sensex plunges 600 points.

Web Summary : Indian stock markets opened lower, with Sensex down 600 points. Nifty fell below 23,500. IT and auto stocks saw heavy selling amid global tensions and rising crude oil prices weakening investor sentiment.