Lokmat Money >शेअर बाजार > शेअर बाजार पुन्हा कोसळला, सेन्सेक्स १००० अंकांनी घसरला; अचानक इतकी घसरण का झाली?

शेअर बाजार पुन्हा कोसळला, सेन्सेक्स १००० अंकांनी घसरला; अचानक इतकी घसरण का झाली?

Stock Market Updates: आठवड्यात सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजार निचांकी पातळीवर घसरला. निफ्टी २४,४०० च्या खाली बंद झाला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2024 16:11 IST2024-12-17T16:10:50+5:302024-12-17T16:11:37+5:30

Stock Market Updates: आठवड्यात सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजार निचांकी पातळीवर घसरला. निफ्टी २४,४०० च्या खाली बंद झाला.

stock market updates today nifty sensex trading stocks in focus indus tower wipro gmr airports vedanta texmeco rail | शेअर बाजार पुन्हा कोसळला, सेन्सेक्स १००० अंकांनी घसरला; अचानक इतकी घसरण का झाली?

शेअर बाजार पुन्हा कोसळला, सेन्सेक्स १००० अंकांनी घसरला; अचानक इतकी घसरण का झाली?

Stock Market Updates : या आठवड्यात सलग दुसऱ्या दिवशी गुंतवणूकदारांना धक्का बसला आहे. डिसेंबर महिनाही शेअर बाजारात अस्थिरतेने जात आहे. मंगळवारची सुरुवात बाजारातील घसरणीने झाली आणि नंतर ही घसरण वाढतच गेली. दिवसभरातील नीचांकी पातळीवर बाजार मोठ्या घसरणीसह बंद झाला. निफ्टी ३३२ अंकांनी घसरून २४,३३६ वर बंद झाला. सेन्सेक्स १०६४ अंकांनी घसरून ८०,६८४ वर बंद झाला आणि निफ्टी बँक ७४६ अंकांनी घसरून ५२,८३४ वर बंद झाला.

आज बँकिंग, एनबीएफसी आणि ऑटो शेअर्समध्येही मोठी विक्री झाली. दिवसभरात सेन्सेक्समधील ३० पैकी २९ शेअर्सची विक्री झाली. तर रियल्टी स्टॉक्समध्ये चांगली वाढ झाली आहे. इंडिया VIX ३.३% वर बंद झाला. निफ्टीवरील मीडिया निर्देशांक वगळता सर्व क्षेत्रीय निर्देशांक लाल रंगात बंद झाले. निफ्टीवर, फक्त सिप्ला आणि आयटीसी किंचित वाढीसह हिरव्या रंगात बंद झाले. सर्वाधिक नुकसान झालेल्यांमध्ये श्रीराम फायनान्स, GRASIM, Hero MotoCorp, Bharti Airtel, JSW स्टील यांचा समावेश आहे. हे २.७% ते ५.२% पर्यंत घसरले.

आज सकाळी बाजारातील घसरणीसह व्यवहाराला सुरुवात झाली. मागील बंदच्या तुलनेत सेन्सेक्स २३७ अंकांनी घसरून ८१,५११ वर उघडला. निफ्टी ८४ अंकांनी घसरून २४,५८४ वर तर बँक निफ्टी १८४ अंकांनी घसरून ५३,३९४ वर उघडला. बँक निफ्टीही कमजोर होता. आणि मिडकॅप निर्देशांकातही थोडी कमजोरी होती.

शेअर बाजार रोज का कोसळतोय? 

या आठवड्याच्या अखेरीस फेडरल रिझर्व्ह बँक व्याजदर आणि महागाईबाबत निर्णय घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे गुंतवणूकदार सावध पावलं टाकत आहेत. दुसरीकडे विदेशी गुंतवणूकदार भारतीय बाजारातून पैसे काढून घेत आहेत. याशिवाय भारत VIX मध्ये देखील वाढ दिसून येत आहे. या सर्व कारणांमुळे शेअर बाजारात घसरण होत आहे.

 

Web Title: stock market updates today nifty sensex trading stocks in focus indus tower wipro gmr airports vedanta texmeco rail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.