Lokmat Money >शेअर बाजार > Stock Market ची मजबूत सुरुवात, सेन्सेक्स २३७ अंकांनी वधारला; निफ्टीतही तेजी, 'हे' शेअर्स सुस्साट

Stock Market ची मजबूत सुरुवात, सेन्सेक्स २३७ अंकांनी वधारला; निफ्टीतही तेजी, 'हे' शेअर्स सुस्साट

आठवड्याच्या पहिल्या सत्रात सोमवारी देशांतर्गत शेअर बाजारानं जोरदार सुरुवात केली. सकाळच्या सुमाराास बाजार उघडला तेव्हा बीएसई बेंचमार्क निर्देशांक सेन्सेक्स २३७.३१ अंकांच्या वाढीसह व्यवहार करत होता.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2025 10:25 IST2025-09-08T10:25:45+5:302025-09-08T10:25:45+5:30

आठवड्याच्या पहिल्या सत्रात सोमवारी देशांतर्गत शेअर बाजारानं जोरदार सुरुवात केली. सकाळच्या सुमाराास बाजार उघडला तेव्हा बीएसई बेंचमार्क निर्देशांक सेन्सेक्स २३७.३१ अंकांच्या वाढीसह व्यवहार करत होता.

Stock Market starts strong Sensex rises by 237 points Nifty also gains these shares are doing well | Stock Market ची मजबूत सुरुवात, सेन्सेक्स २३७ अंकांनी वधारला; निफ्टीतही तेजी, 'हे' शेअर्स सुस्साट

Stock Market ची मजबूत सुरुवात, सेन्सेक्स २३७ अंकांनी वधारला; निफ्टीतही तेजी, 'हे' शेअर्स सुस्साट

आठवड्याच्या पहिल्या सत्रात सोमवारी देशांतर्गत शेअर बाजारानं जोरदार सुरुवात केली. सकाळच्या सुमाराास बाजार उघडला तेव्हा बीएसई बेंचमार्क निर्देशांक सेन्सेक्स २३७.३१ अंकांच्या वाढीसह ८०,९४८.०७ वर व्यवहार करत होता. त्याचप्रमाणे, निफ्टी देखील ६८.९५ अंकांच्या वाढीसह २४,८०९.९५ अंकांवर व्यवहार करताना दिसला. सुरुवातीच्या व्यवहारात, टाटा स्टील, टाटा मोटर्स, श्रीराम फायनान्स, हिंडाल्को, एसबीआय हे निफ्टीमध्ये सर्वाधिक तेजी असलेले शेअर्स ठरले. तर एसबीआय लाईफ इन्शुरन्स, एशियन पेंट्स, कोटक महिंद्रा बँक, ट्रेंट, टाटा कंझ्युमर या कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली.

बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांक स्थिर व्यवहार करत आहेत. इतर क्षेत्रांवर नजर टाकल्यास, मेटल, ऑईल अँड गॅस, वीज, रिअल्टीमध्ये ०.५% नं वाढ झाली, तर कन्झ्युमर ड्युरेबल्समध्ये ०.५% नं घसरण झाली.

Bank of Baroda मध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹२३,५०८ चं फिक्स व्याज, गॅरेंटीसह मिळेल रक्कम

आशियाई बाजारांमध्ये कसा ट्रेंड होता

लाइव्हमिंटच्या रिपोर्टनुसार, जपानी पंतप्रधान शिगेरू इशिबा यांच्या राजीनाम्यानंतर गुंतवणूकदारांनी परिस्थितीचं मूल्यांकन करण्यास सुरुवात केल्यानं सोमवारी आशियाई शेअर बाजारातील बहुतेक निर्देशांकांमध्ये वाढ झाली. यासोबतच, प्रादेशिक आर्थिक डेटावरही बारकाईनं लक्ष ठेवले जात आहे. जपानच्या निक्केई २२५ मध्ये ०.९५% वाढ झाली, तर टॉपिक्स निर्देशांकातही ०.५१% वाढ झाली. दक्षिण कोरियाचा कोस्पी निर्देशांक ०.१५% वाढला आणि स्मॉल-कॅप कोस्डॅकनं ०.४७% वाढीसह सुरुवात केली.

Web Title: Stock Market starts strong Sensex rises by 237 points Nifty also gains these shares are doing well

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.