आता जन्माच्या वेळी आधार कार्ड तयार होणार, कशी असेल प्रक्रिया? जाणून घ्या
आता बाळाच्या जन्माच्याच वेळी आधार कार्ड तयार करण्याचा सरकार विचार करत आहे. काय आहे प्लान?
देशात आधार कार्डसाठी एक सामान्य नेटवर्क प्लॅटफॉर्म तयार करण्याच्या दिशेने पावले उचलली जात आहेत. व्हिजन-२०४७ अंतर्गत सरकारकडून या योजनेवर काम केलं जात आहे.
या अंतर्गत, जन्माच्या वेळी बाळाचं आधार कार्ड तयार केलं जाईल आणि अंगणवाडी, शाळा आणि महाविद्यालयापर्यंत फॉलो-अप सिस्टम तयार केली जाईल.
यामध्ये, विभागांच्या प्रमुख योजनेबाबत ऑटो मोडवर आधार डेटादेखीलशेअर केला जाईल. नवीन प्रणालीनंतर, बनावट आधार कार्ड बनवण्याच्या तक्रारीदेखील दूर होतील.
अलीकडेच, शालेय शिक्षण आणि महिला आणि बालविकास विभागानं अंगणवाड्यांमध्ये प्री-स्कूलिंगबाबत मोहीम सुरू केली आहे. सध्या देशात १३९ कोटींहून अधिक आधार कार्ड उपलब्ध आहेत.
तर दरवर्षी सरासरी २.५ कोटी मुले जन्माला येतात. मात्र, अनेक मुलांकडे सध्या आधार कार्ड नाही. त्यामुळेच सरकारकडून हा उपाय सुरू आहे.
Post Office च्या 'या' स्कीममध्ये वर्षाला ₹५०,००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळतील १३ लाख