Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money >शेअर बाजार > Stock Markets Today: किरकोळ तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाची सुरुवात, Nifty २६,००० च्या जवळ; ऑटो शेअर्समध्ये तेजी

Stock Markets Today: किरकोळ तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाची सुरुवात, Nifty २६,००० च्या जवळ; ऑटो शेअर्समध्ये तेजी

Stock Markets Today: देशांतर्गत शेअर बाजारात सलग तीन दिवसांच्या तेजीनंतर बुधवारीही व्यवहाराची सुरुवात ग्रीन झोनमध्ये झाली आहे. बाजार उघडताच सेन्सेक्स ८२ अंकांच्या वाढीसह ८४,३५६ च्या आसपास व्यवहार करत होता.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2026 10:14 IST2026-02-11T10:14:28+5:302026-02-11T10:14:28+5:30

Stock Markets Today: देशांतर्गत शेअर बाजारात सलग तीन दिवसांच्या तेजीनंतर बुधवारीही व्यवहाराची सुरुवात ग्रीन झोनमध्ये झाली आहे. बाजार उघडताच सेन्सेक्स ८२ अंकांच्या वाढीसह ८४,३५६ च्या आसपास व्यवहार करत होता.

Stock market opens with minor gains Nifty nears 26000 tata motors Auto shares rise | Stock Markets Today: किरकोळ तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाची सुरुवात, Nifty २६,००० च्या जवळ; ऑटो शेअर्समध्ये तेजी

Stock Markets Today: किरकोळ तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाची सुरुवात, Nifty २६,००० च्या जवळ; ऑटो शेअर्समध्ये तेजी

Stock Markets Today: देशांतर्गत शेअर बाजारात सलग तीन दिवसांच्या तेजीनंतर बुधवारीही व्यवहाराची सुरुवात ग्रीन झोनमध्ये झाली आहे. बाजार उघडताच सेन्सेक्स ८२ अंकांच्या वाढीसह ८४,३५६ च्या आसपास व्यवहार करत होता, तर निफ्टी ३१ अंकांनी वधारून २५,९६६ वर पोहोचला होता. सकाळी ०९:३१ वाजता सेन्सेक्स ४८ अंकांच्या वाढीसह ८४,३२२ वर होता, तर निफ्टी ३९ अंकांच्या तेजीसह २६,९७२ वर ट्रेड करत होता. दुसरीकडे, बँक निफ्टीमध्ये आजही कमकुवतपणा दिसून आला असून हा निर्देशांक ७० अंकांनी घसरून ६०,५५६ च्या जवळ होता. मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांक मात्र लाल निशाण्यावर व्यवहार करत होते.

क्षेत्रीय हालचाल आणि निर्देशांकांची स्थिती

बाजारातील अस्थिरता मोजणारा 'India VIX' २.०३ टक्क्यांनी खाली होता. क्षेत्रीय निर्देशांकांचा विचार करता, ऑटो इंडेक्समध्ये १ टक्क्यांहून अधिक तेजी पाहायला मिळाली. यासोबतच हेल्थकेअर, कंज्युमर ड्युरेबल्स, एफएमसीजी, मेटल आणि फार्मा इंडेक्समध्येही खरेदीचा ओघ दिसून आला. याउलट रियल्टी, पीएसयू बँक, मीडिया, आयटी आणि प्रायव्हेट बँक हे निर्देशांकाच आज घसरण दिसून आली.

Post Office ची कमालीची स्कीम… झिरो रिस्क आणि दर महिन्याला ₹१७,००० हजारांची कमाई, पाहा कसं?

प्रमुख शेअर्समधील चढ-उतार

निफ्टी ५० निर्देशांकावर Eicher Motors, Apollo Hospital, M&M, Max Healthcare, TMPV आणि Maruti या शेअर्समध्ये सर्वाधिक तेजी नोंदवण्यात आली. याच्या विरुद्ध बाजूला ONGC, Coal India, Hindalco, Grasim, Trent, Eternal, HCL Tech आणि TCS हे शेअर्स आजचे टॉप लूजर्स ठरले.

जागतिक बाजारातील संमिश्र संकेत

काल अमेरिकन बाजारात टेक शेअर्समध्ये नफावसुली दिसून आली, तरीही डाओ जोन्सने नवीन ऐतिहासिक उच्चांक गाठत सलग तिसऱ्या दिवशी विक्रमी पातळीवर बंद होण्याचा मान मिळवला. दोन दिवसांच्या तेजीनंतर नॅस्डॅक सुमारे १५० अंकांनी घसरला. सध्या गिफ्ट निफ्टी सुमारे ७० अंकांच्या वाढीसह २६,०५० च्या जवळ असून डाओ फ्युचर्स देखील १०० अंकांनी वर आहेत, ज्यामुळे भारतीय बाजाराची सुरुवात सकारात्मक क्षेत्रात होण्यास मदत झाली.

Web Title : शेयर बाजार मामूली बढ़त के साथ खुला; ऑटो शेयरों में तेजी।

Web Summary : भारतीय शेयर बाजार सकारात्मक शुरुआत करता है, निफ्टी 26,000 के करीब। ऑटो क्षेत्र में बढ़त, जबकि आईटी और बैंक क्षेत्र कमजोर। वैश्विक संकेत मिले जुले।

Web Title : Stock market opens with slight gains; auto shares rise.

Web Summary : Indian stock market starts positively, Nifty nears 26,000. Auto sector leads gains, while IT and bank sectors show weakness. Global cues mixed.