Lokmat Money >शेअर बाजार > LIC चा मोठा डाव, खरेदी केले बाबा रामदेव यांच्या कंपनीचे तब्बल ७३ लाख शेअर; रॉकेट बनला स्टॉक

LIC चा मोठा डाव, खरेदी केले बाबा रामदेव यांच्या कंपनीचे तब्बल ७३ लाख शेअर; रॉकेट बनला स्टॉक

या कंपनीत एलआयसीने जवळपास 2% हिस्सेदारी वाढवली आहे. यामुळे या शेअरमध्ये आज तेजी दिसून आली. आता पतंजली फूड्समधील कंपनीची एकूण हिस्सेदारी 7.06% पर्यंत पोहोचली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2025 17:48 IST2025-03-05T17:47:53+5:302025-03-05T17:48:28+5:30

या कंपनीत एलआयसीने जवळपास 2% हिस्सेदारी वाढवली आहे. यामुळे या शेअरमध्ये आज तेजी दिसून आली. आता पतंजली फूड्समधील कंपनीची एकूण हिस्सेदारी 7.06% पर्यंत पोहोचली आहे.

Stock Market lic raise stake in patanjali foods to buy 73 lakh shares Baba ramdev | LIC चा मोठा डाव, खरेदी केले बाबा रामदेव यांच्या कंपनीचे तब्बल ७३ लाख शेअर; रॉकेट बनला स्टॉक

LIC चा मोठा डाव, खरेदी केले बाबा रामदेव यांच्या कंपनीचे तब्बल ७३ लाख शेअर; रॉकेट बनला स्टॉक

शेअर बाजारातील बाबा रामदेव यांच्या पतंजली फूड्स कंपनीचा शेअर आज व्यवहारादरम्यान फोकसमध्ये होता. हा शेअर आज 2% ने वधारून 1759 रुपयांच्या इंट्रा डे हाईवर पोहोचला होता. खरे तर, LIC ने ओपन मार्केटच्या माध्यमाने पतंजली फूड्सचे मोठ्या प्रमाणावर शेअर विकत घेतले आहेत. या कंपनीत एलआयसीने जवळपास 2% हिस्सेदारी वाढवली आहे. यामुळे या शेअरमध्ये आज तेजी दिसून आली. आता पतंजली फूड्समधील कंपनीची एकूण हिस्सेदारी 7.06% पर्यंत पोहोचली आहे.

73 लाख शेअरची खरेदी -
यासंदर्भात आज एलआयसीने एका नियामक फाइलिंगमध्ये माहिती दिली आहे. आपण २५ नोव्हेंबर २०२४ ते ४ मार्च २०२५ दरम्यान पतंजली फूड्सचे ७३ लाख शेअर्स खरेदी केल्याचे कंपनीने म्हटले आहे. डिसेंबर तिमाहीच्या अखेरपर्यंत, कंपनीमध्ये प्रमोरटर्सचा वाटा 69.95% एवढा होता. तर FII आणि DII कडे अनुक्रमे 13.3% आणि 6.3% एवढा वाटा होता. तसेच, उर्वरित 10.3% वाटा सर्वसामान्य शेयरधारकांकडे होता. ही कंपनी प्रामुख्याने तेलबियांच्या प्रक्रियेत आणि खाद्यतेलाच्या शुद्धीकरणात सक्रिय आहे.

बाबा रामदेव यांच्या नेतृत्वाखालील पतंजली आयुर्वेदने २०१९ मध्ये रुची सोया इंडस्ट्रीजचे अधिग्रहण केले. यानंतर कंपनीचे नाव बदलून पतंजली फूड्स ठेवले. जानेवारी २०२० मध्ये, रुची सोयाचे (आता पतंजली फूड्स) शेअर्स पुन्हा सूचीबद्ध करण्यात आले.


महत्वाचे म्हणजे, डिसेंबर तिमाहीत (Q3FY25), कंपनीच्या निव्वळ नफ्यात 71% वाढ होऊन तो ₹371 कोटीवर  पोहोचला आहे. तर गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा ₹ २१७ कोटी एवढा होता. डिसेंबर तिमाहीत कंपनीचा महसूल ₹९,१०३ कोटी होता, जो आर्थिक वर्ष २०२४ च्या तिसऱ्या तिमाहीतील ₹७,९११ कोटींपेक्षा १५% ने अधिक आहे. 

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)
 

Web Title: Stock Market lic raise stake in patanjali foods to buy 73 lakh shares Baba ramdev

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.