Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money >शेअर बाजार > Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली

Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली

Share Market: भारतीय शेअर बाजारासाठी ९ एप्रिलची सकाळ निराशाजनक ठरली. जागतिक बाजारातून मिळणारे संमिश्र संकेत आणि देशांतर्गत स्तरावर सुरू असलेली अस्थिरता यामुळे सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही रेड झोनमध्ये उघडले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2026 10:05 IST2026-04-09T10:05:36+5:302026-04-09T10:05:36+5:30

Share Market: भारतीय शेअर बाजारासाठी ९ एप्रिलची सकाळ निराशाजनक ठरली. जागतिक बाजारातून मिळणारे संमिश्र संकेत आणि देशांतर्गत स्तरावर सुरू असलेली अस्थिरता यामुळे सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही रेड झोनमध्ये उघडले.

Stock market decline Sensex falls by more than 500 points Nifty below 23900 global market gift nifty down | Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली

Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली

Share Market: भारतीय शेअर बाजारासाठी ९ एप्रिलची सकाळ निराशाजनक ठरली. जागतिक बाजारातून मिळणारे संमिश्र संकेत आणि देशांतर्गत स्तरावर सुरू असलेली अस्थिरता यामुळे सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही रेड झोनमध्ये उघडले. विक्रीच्या प्रचंड दबावामुळे गुंतवणूकदारांमध्ये काहीशी चिंता दिसून आली, ज्यामुळे बाजार उघडताच सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला. त्यानंतर त्यात आणखी घसरण झाली.

आज सकाळी व्यवहार सुरू होताच बीएसई सेन्सेक्स ५३१.५९ अंकांनी घसरुन ७७,०३१.३१ च्या पातळीवर आला. दुसरीकडे, एनएसई निफ्टी देखील १५३.८० अंकांच्या घसरणीसह २३,८४३.५५ वर पोहोचला. 

Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड

कोणत्या शेअर्समध्ये झाली हालचाल? 

आजच्या सुरुवातीच्या व्यवहारात एनटीपीसी (NTPC), भारत इलेक्ट्रॉनिक्स (BEL), मॅक्स हेल्थकेअर, बजाज ऑटो आणि हिंदाल्को यांसारख्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये मजबूती दिसून आली. याउलट, बजाज फायनान्स, श्रीराम फायनान्स, अदानी पोर्ट्स, इन्फोसिस आणि महिंद्रा अँड महिंद्रा (M&M) यांसारखी मोठी नावं विक्रीच्या दबावाखाली राहिली आणि 'टॉप लूजर्स'च्या यादीत सामील झाली. बाजारातील आकडेवारीनुसार, सुमारे १२१५ शेअर्समध्ये तेजी दिसली, तर १२८८ शेअर्स घसरणीसह व्यवहार करत होते. तसेच १७४ शेअर्सच्या स्थितीत कोणताही बदल झाला नाही.

घसरणीची मुख्य कारणं

तज्ज्ञांच्या मते, कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली अस्थिरता आणि अमेरिका-इराणमधील शस्त्रसंधीबाबत गुंतवणूकदारांच्या मनात असलेली शंका ही घसरणीची प्रमुख कारणे आहेत. शस्त्रसंधीची घोषणा झाली असली तरी, पुरवठा साखळी आणि जागतिक आर्थिक स्थितीबाबत व्यापारी अजूनही 'वेट अँड वॉच' अशा भूमिकेत आहेत. याशिवाय, परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांकडून (FIIs) होत असलेल्या विक्रीमुळेही देशांतर्गत बाजारावर दबाव निर्माण झालाय.

गुंतवणूकदारांसाठी सल्ला

बाजार तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, सध्या बाजारात मोठा चढ-उतार पाहायला मिळू शकतो. अशा परिस्थितीत लहान गुंतवणूकदारांनी घाईघाईनं मोठे निर्णय घेणं टाळलं पाहिजे. चांगल्या फंडामेंटल्स असलेल्या शेअर्समध्ये दीर्घकाळासाठी गुंतवणूक कायम ठेवणं हा एक उत्तम पर्याय असू शकतो.

Web Title : शेयर बाजार में गिरावट: सेंसेक्स 500 अंक से अधिक गिरा, निफ्टी 23,900 से नीचे

Web Summary : भारतीय शेयर बाजार की निराशाजनक शुरुआत हुई, सेंसेक्स और निफ्टी दोनों लाल निशान में खुले। वैश्विक संकेतों, घरेलू अस्थिरता और बिकवाली के दबाव के कारण सेंसेक्स 500 अंक से अधिक गिर गया। विशेषज्ञों ने निवेशकों को बाजार में अस्थिरता के बीच सतर्क रहने और दीर्घकालिक निवेश पर विचार करने की सलाह दी है।

Web Title : Share Market Plummets: Sensex Down Over 500 Points, Nifty Below 23,900

Web Summary : Indian stock markets faced a disappointing start, with both Sensex and Nifty opening in the red. Sensex declined over 500 points due to global cues, domestic instability, and selling pressure. Experts advise investors to remain cautious amid market volatility and consider long-term investments.