Lokmat Money >शेअर बाजार > डिफेन्स शेअर्सची घोडदौड सुरुच; मिड आणि स्मॉलकॅपमध्येही तेजी, 'या' स्टॉक्सना मोठं नुकसान

डिफेन्स शेअर्सची घोडदौड सुरुच; मिड आणि स्मॉलकॅपमध्येही तेजी, 'या' स्टॉक्सना मोठं नुकसान

Share Market : भारतीय शेअर बाजारात आज संमिश्र प्रतिसाद पाहायला मिळाला. मिडकॅप आणि स्मॉलकॅप समभागांमध्ये वाढ दिसून तर निफ्टी बँक रिकव्हरीनंतर फ्लॅट बंद झाला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2025 17:05 IST2025-05-16T17:02:34+5:302025-05-16T17:05:34+5:30

Share Market : भारतीय शेअर बाजारात आज संमिश्र प्रतिसाद पाहायला मिळाला. मिडकॅप आणि स्मॉलकॅप समभागांमध्ये वाढ दिसून तर निफ्टी बँक रिकव्हरीनंतर फ्लॅट बंद झाला.

stock market closing sensex nifty top gainers losers 16 may 2025 | डिफेन्स शेअर्सची घोडदौड सुरुच; मिड आणि स्मॉलकॅपमध्येही तेजी, 'या' स्टॉक्सना मोठं नुकसान

डिफेन्स शेअर्सची घोडदौड सुरुच; मिड आणि स्मॉलकॅपमध्येही तेजी, 'या' स्टॉक्सना मोठं नुकसान

Share Market : गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजार प्रचंड अस्थिर झाला आहे. कधी बाजारात तेजी येत तर कधी घसरण पाहायला मिळते. गुरुवारच्या वाढीनंतर आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजारात संमिश्र कल दिसून आला. शुक्रवारी निफ्टी मिडकॅप (Midcap) आणि स्मॉलकॅप (Smallcap) शेअर्समध्ये चांगली वाढ झाली. मात्र, निफ्टी बँक (Nifty Bank) मध्ये फारशी हालचाल न होता तो सपाट स्तरावर बंद झाला. संरक्षण (Defence) क्षेत्रातील शेअर्समध्ये जोरदार तेजी दिसून आली आणि निफ्टी डिफेन्स इंडेक्स (Nifty Defence Index) विक्रमी उच्चांकावर बंद झाला.

क्षेत्रीय पातळीवर, पीएसई (PSE), रिअल्टी (Realty) आणि ऊर्जा (Energy) क्षेत्रातील शेअर्समध्ये खरेदी दिसून आली. एफएमसीजी (FMCG) आणि ऑटो (Auto) इंडेक्समध्ये वाढ झाली, तर आयटी (IT) आणि फार्मा (Pharma) इंडेक्समध्ये थोडीशी घसरण झाली.

आज बाजार कोणत्या स्तरावर बंद झाला?
शुक्रवारी दिवसभरच्या कामकाजानंतर सेन्सेक्स (Sensex) २०० अंकांनी घसरून ८२,३३१ च्या स्तरावर बंद झाला. तर, निफ्टी (Nifty) ४२ अंकांनी वाढून २५,०२० च्या स्तरावर बंद झाला. निफ्टी बँक ५५,३५५ च्या स्तरावर स्थिर राहिला. निफ्टी मिडकॅप इंडेक्स ५३० अंकांच्या वाढीसह ५७,०६१ वर बंद झाला.

आज कोणत्या शेअर्समध्ये वाढ? कुठे झाली घसरण?
संरक्षण क्षेत्रातील स्टॉक्समध्ये तेजी दिसून आली, ज्यात कोचीन शिपयार्ड (Cochin Shipyard) १२% नी वाढून बंद झाला. मजबूत कमाई आणि मार्जिन वाढीमुळे धानुका ॲग्रीटेक (Dhanuka Agritech) १०% नी वाढला. जुबिलंट फार्माव्हा (Jubilant Pharmova) चौथ्या तिमाहीच्या निकालानंतर ४% नी वाढला. तर, कमाई आणि नफा अपेक्षेपेक्षा कमी राहिल्याने बीएचईएल (BHEL) सुरुवातीच्या वाढीनंतर ४% नी घसरला.

नफा आणि EBITDA अपेक्षेपेक्षा चांगले राहिल्याने क्रॉम्प्टन ग्रीव्हज (Crompton Greaves) ७% नी वाढला. मजबूत कामगिरीमुळे एसकेएफ इंडिया (SKF India) ६% नी वाढला. आज भारती एअरटेलमध्ये (Bharti Airtel) ब्लॉक डील झाल्यामुळे हा स्टॉक ३% पर्यंत घसरला आणि निफ्टीमधील सर्वाधिक घसरलेल्या स्टॉक्समध्ये सामील झाला. जेएसडब्ल्यू इन्फ्रा (JSW Infra) ३% नी घसरला, कारण सज्जन जिंदल ट्रस्टने त्यांचे ४.२ कोटी शेअर्स ३% डिस्काउंटवर विकले.

या आठवड्यात बाजाराची चाल कशी राहिली?
या आठवड्यात बाजार साप्ताहिक आधारावर वाढीसह बंद झाला. निफ्टी आणि सेन्सेक्समध्ये ४% ची वाढ झाली. या आठवड्यात मोठ्या प्रमाणात खरेदी दिसून आली आणि गेल्या दोन महिन्यांत पहिल्यांदाच मिडकॅप इंडेक्समध्ये सर्वाधिक म्हणजे ७% ची वाढ झाली.

वाचा - टीम कुक यांनी ट्रम्प यांचा सल्ला का धुडकावला? अ‍ॅपल अमेरिकेला स्थलांतरीत केल्यास काय होईल?

निफ्टीमधील ५० पैकी ४७ स्टॉक्स वाढीसह बंद झाले. मिडकॅपमधील सर्वाधिक वाढलेल्या शेअर्समध्ये इंटेलेक्ट डिझाइन (Intellect Design), एनबीसीसी (NBCC), एंजल वन (Angel One), आयआरएफसी (IRFC) आणि एसजेव्हीएन (SJVN) यांचा समावेश होता. तर, निफ्टीमधील सर्वाधिक वाढलेल्या शेअर्समध्ये बीईएल (BEL), अदानी एंटरप्रायझेस (Adani Enterprises), हिरो मोटोकॉर्प (Hero MotoCorp), जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस (Jio Financial Services) आणि श्रीराम फायनान्स (Shriram Finance) आघाडीवर होते.

Web Title: stock market closing sensex nifty top gainers losers 16 may 2025

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.