Lokmat Money >शेअर बाजार > भारत-पाकिस्तान तणावामुळे बाजारात दबाव; मिडकॅप-स्मॉलकॅप शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण

भारत-पाकिस्तान तणावामुळे बाजारात दबाव; मिडकॅप-स्मॉलकॅप शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण

Share Market : भारत-पाकिस्तान तणावानंतर शेअर बाजारात दबाव दिसून आला. मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकांमध्ये सर्वाधिक घसरण झाली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2025 16:51 IST2025-05-08T16:51:13+5:302025-05-08T16:51:13+5:30

Share Market : भारत-पाकिस्तान तणावानंतर शेअर बाजारात दबाव दिसून आला. मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकांमध्ये सर्वाधिक घसरण झाली.

stock market closing sensex nifty share market news nifty top gaines losers | भारत-पाकिस्तान तणावामुळे बाजारात दबाव; मिडकॅप-स्मॉलकॅप शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण

भारत-पाकिस्तान तणावामुळे बाजारात दबाव; मिडकॅप-स्मॉलकॅप शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण

Share Market : 'ओपरेशन सिंदूर' मोहीम राबवत भारतीय सैन्याने पाकिस्तानमधील ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केली आहेत. यानंतर बुधवारी रात्री पाकिस्तानने भारतातील १४ शहरांना लक्ष्य करण्यचा प्रयत्न केला. सध्या दोन्ही देशात तणावग्रस्त परिस्थिती आहे. याचा परिणाम दोन्ही देशांच्या शेअर बाजारावरही पाहायला मिळाला. कराची बाजार तब्बल ७ टक्क्यांनी कोसळला. आपल्याकडे तशी परिस्थिती झाली नसली तरी सेन्सेक्स आणि निफ्टी सुमारे १% ने घसरले. मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकांमध्ये सर्वाधिक घसरण झाली. क्षेत्रीय आघाडीवर बोलायचं झालं तर रिअल्टी, मेटल, पीएसई आणि ऑटो निर्देशांक घसरणीसह बंद झाले. ऊर्जा, तेल-वायू आणि औषध कंपन्यांचे शेअर्सही दबावाखाली राहिले. फक्त डिफेन्स स्टॉक्समध्ये वाढ नोंदवली गेली.

बाजार कोणत्या पातळीवर बंद झाला?
निफ्टी १४१ अंकांनी घसरून २४,२७४ वर बंद झाला. तर सेन्सेक्स ४१२ अंकांनी घसरून ८०,३३५ वर बंद झाला. निफ्टी बँक २४५ अंकांनी घसरून ५४,३६६ वर बंद झाला. मिडकॅप १,०५८ अंकांनी घसरून ५३,२२९ वर बंद झाला.

कोणत्या स्टॉकमध्ये चढउतार?
दोन देशांच्या तणावादम्यान बाजार दिवसाच्या नीचांकी पातळीवर बंद झाला. व्यापक बाजारात मोठी घसरण दिसून आली. रुपयातही मोठी घसरण झाली असून तो दिवसाच्या नीचांकी पातळीवर जवळजवळ १.५% घसरून बंद झाला. रुपयाची गेल्या २ वर्षातील सर्वात मोठी एका दिवसाची घसरण आहे. शेवटच्या तासात, ३ शेअर्समध्ये घसरण झाली तर १ शेअर वाढला. निफ्टीचे ४५ शेअर्स लाल रंगात बंद झाले. या शेअर्समध्ये ४% पर्यंत घसरण झाली. बहुतेक मिडकॅप समभागांमध्ये मोठी घसरण झाली, १०० पैकी ९४ मिडकॅप निर्देशांक समभागांमध्ये घसरण झाली.

वाचा - 'ऑपरेशन सिंदूर' भारतीय शौर्याचे प्रतीक, हा शब्द आता.. ट्रेडमार्कवर रिलायन्सचे स्पष्टीकरण

कॅनरा बँकेच्या कमाईच्या अहवालानंतर, शेअरमध्ये २% पेक्षा जास्त वाढ दिसून आली. भारत फोर्ज, एस्कॉर्ट्स कुबोटा आणि एशियन पेंट्स यांचे चौथ्या तिमाहीच्या निकालांनंतर घसरण झाली. सिम्फनी आणि निवा बुपा यांनी चांगले निकाल नोंदवले, त्यांच्या समभागात ७-८% वाढ झाली. चीनने सायपरमेथ्रिन आयातीवर अँटी-डंपिंग शुल्क लादल्यानंतर यूपीएलमध्ये ५% घट झाली. चौथ्या तिमाहीतील उत्पन्न अंदाजापेक्षा कमी आल्यानंतर व्होल्टास आणि ब्लू स्टारच्या शेअर्समध्ये २-५% घट झाली आहे.
 

Web Title: stock market closing sensex nifty share market news nifty top gaines losers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.