Share Market Today, 27 February, 2026: देशांतर्गत शेअर बाजारानं शुक्रवारी पुन्हा एकदा घसरणीसह रेड झोनमध्ये व्यवहाराची सुरुवात केली. आठवड्याच्या शेवटच्या दिवशी, बीएसई (BSE) सेन्सेक्स २८.१३ अंकांच्या (०.०३%) किरकोळ घसरणीसह ८२,२२०.४८ अंकांवर उघडला. त्याचप्रमाणे, एनएसईच्या (NSE) निफ्टी ५० निर्देशांकानेही ३६.७० अंकांच्या (०.१४%) नुकसानीसह २५,४५९.८५ अंकांवर व्यवहार सुरू केला. मात्र त्यानंतर त्यात मोठी घसरण झाली. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफबाबत दिलेल्या विधानांचा बाजारावर मोठ्या प्रमाणावर परिणाम झाला. टॅरिफवरील ट्रम्प यांचं हे ताजे विधान अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर आलंय.
निफ्टी ५० मधील ४३ कंपन्यांचे शेअर्स रेड झोनमध्ये
शुक्रवारी सेन्सेक्समधील ३० पैकी केवळ ५ कंपन्यांच्या शेअर्सनी ग्रीन झोमध्ये व्यवहार सुरू केला, तर उर्वरित २४ कंपन्यांचे शेअर्स घसरणीसह लाल निशाणात उघडले. 'पावर ग्रिड'चा शेअर आज कोणताही बदल न होता उघडला. तसंच, निफ्टी ५० मधील ५० पैकी फक्त ७ कंपन्यांचे स्टॉक्स वेगानं ग्रीन झोनमध्ये उघडले आणि उर्वरित सर्व ४३ कंपन्यांचे शेअर्स नुकसानीसह रेड झोनमध्ये उघडले. सेन्सेक्समधील कंपन्यांमध्ये 'इन्फोसिस'चे शेअर्स आज सर्वाधिक २.७७ टक्क्यांच्या वाढीसह उघडले, तर 'भारती एअरटेल'चे शेअर्स आज सर्वाधिक १.२६ टक्क्यांच्या घसरणीसह उघडले.
Canara Bank मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹७९,५०० चं फिक्स व्याज; कोणती आहे स्कीम, पाहा डिटेल्स
सेन्सेक्समधील इतर शेअर्सची स्थिती
सेन्सेक्समधील इतर स्टॉक्समध्ये आज टेक महिंद्राचे शेअर्स २.४७ टक्के, एचसीएल टेक १.४३ टक्के, टीसीएस ०.९३ टक्के आणि ट्रेंटचे शेअर्स ०.०६ टक्क्यांच्या वाढीसह उघडले. दुसरीकडे, इंडिगोचे शेअर्स १.२४ टक्के, मारुती सुझुकी १.०८ टक्के, अल्ट्राटेक सिमेंट १.०४ टक्के, अदानी पोर्ट्स ०.९५ टक्के, रिलायन्स इंडस्ट्रीज ०.८४ टक्के, महिंद्रा अँड महिंद्रा ०.७७ टक्के, हिंदुस्तान युनिलिव्हर ०.७५ टक्के, बीईएल ०.७० टक्के, बजाज फिनसर्व्ह ०.६४ टक्के, कोटक महिंद्रा बँक ०.६२ टक्के, टाटा स्टील ०.६० टक्के, सन फार्मा ०.५२ टक्के, आयसीआयसीआय बँक ०.४९ टक्के, एटरनल ०.४५ टक्के, ॲक्सिस बँक ०.३८ टक्के, एसबीआय ०.२९ टक्के, आयटीसी ०.२८ टक्के, बजाज फायनान्स ०.२७ टक्के, एशियन पेंट्स ०.२५ टक्के, एलअँडटी ०.२२ टक्के, टायटन ०.१५ टक्के, एचडीएफसी बँक ०.०९ टक्के आणि एनटीपीसीचे शेअर्स ०.०४ टक्क्यांच्या घसरणीसह उघडले.
