Lokmat Money >शेअर बाजार > 7 रुपयांच्या शेअरची कमाल, 480% नं वाढलाय भाव; 19 दिवसांपासून लागतंय अप्पर सर्किट, करतोय मालामाल

7 रुपयांच्या शेअरची कमाल, 480% नं वाढलाय भाव; 19 दिवसांपासून लागतंय अप्पर सर्किट, करतोय मालामाल

या शेअरमध्ये वर्षभरात 480% ची तेजी नोंदवण्यात आली आहे. एका वर्षापूर्वी या शेअरची किंमत 7 रुपये होती. सोमवारी बीएसईवर हा शेअर ₹43.12 वर पोहोचला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2025 20:09 IST2025-07-14T20:08:15+5:302025-07-14T20:09:03+5:30

या शेअरमध्ये वर्षभरात 480% ची तेजी नोंदवण्यात आली आहे. एका वर्षापूर्वी या शेअरची किंमत 7 रुपये होती. सोमवारी बीएसईवर हा शेअर ₹43.12 वर पोहोचला.

Share market small cap Colab Platforms Ltd multibagger stock hits continue 19 days share surges 480 percent from 7 rupees | 7 रुपयांच्या शेअरची कमाल, 480% नं वाढलाय भाव; 19 दिवसांपासून लागतंय अप्पर सर्किट, करतोय मालामाल

7 रुपयांच्या शेअरची कमाल, 480% नं वाढलाय भाव; 19 दिवसांपासून लागतंय अप्पर सर्किट, करतोय मालामाल


शेअर बाजारातील स्मॉल-कॅप मल्टीबॅगर स्टॉक कोलाब प्लॅटफॉर्मप् लिमिटेड (Colab Platforms Ltd)च्या शेअरमध्ये आज सोमवारीही सलग 19व्या सेशनमध्येही अप्पर सर्किटलागले आहे. हा शेअर आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा देत आहे. 

या शेअरमध्ये वर्षभरात 480% ची तेजी नोंदवण्यात आली आहे. एका वर्षापूर्वी या शेअरची किंमत 7 रुपये होती. सोमवारी बीएसईवर हा शेअर ₹43.12 वर पोहोचला. महत्वाचे म्हणजे आज ओपन होताच याला 2 टक्क्यांचे अप्पर सर्किट लागले. यानंतर तो याच किंमतीवर म्हणजेच 43.12 वर बंद झाला.

ऑक्टोबर महिन्यात ₹5.42 वर होता हा शेअर
स्मॉल-कॅप स्टॉक कोलाब प्लेटफॉर्म्सची शेअर प्राइस ऑक्टोबर महिन्यात ₹5.42 या 52-आठवड्यांच्या अथवा 1-वर्षाच्या नीचांकी पातळीवर पोहोचली होती. यानंत, या वर्षाच्या मे महिन्यात या शेअरमध्ये जबरदस्त तेजी आली आणि तो ₹76.18 रुपयांच्या  52 आठवड्यांच्या अथवा एक वर्षाच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला होता. 

पाच वर्षांषांचा विचार करता 3856% ने वधारला हा शेअर -
या शेअरची किंमत एका महिन्यात 60% ने वधारली आहे. 2025 मध्ये आजपर्यंत हा शेअर 180% ने वधारला आहे. एका वर्षात 483% वाढला. तर पाच वर्षांचा विचार करता हा शेअर 3856% ने वधारला आहे. अशा पद्धतीने या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा दिला आहे. 

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)

Web Title: Share market small cap Colab Platforms Ltd multibagger stock hits continue 19 days share surges 480 percent from 7 rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.