शेअर बाजारात गेल्या काही वर्षांमध्ये, ज्या काही कंपन्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना छप्परफाड परतावा देऊन मालामाल केले, त्यांपैकीच एक म्हणजे, सर्व्होटेक पॉवर सिस्टम्स. या कंपनीच्या शेअरने गेल्या 5 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना तब्बल 12182 टक्क्याचा परतावा अथवा रिटर्न दिला आहे.
या कंपनीसंदर्भात आणखी एक आनंदाची बातमी म्हणजे, ही कंपनी भागीदारीच्या माध्यमाने जर्मनीमध्ये एका मोठ्या प्रकल्पावर काम करणार आहे. सर्वोटेक पॉवर सिस्टम्स सोलर उत्पादने, ईव्ही चार्जर, डीसी चार्जर आणि होम एसी चार्जरचे उत्पादनात कार्यरत आहे.
असा असेल नवा प्रोजेक्ट -
कंपनीने एक्सचेंजला दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी LESSzwei GmbH सोबत भागीदारी केली असून कंपनी जर्मनीमध्ये 100 टक्के सौर ऊर्जेवर चालणारी ईव्ही चार्जिंग सिस्टीम तयार करणार आहे. या चार्जिंग स्टेशनद्वारे ई-बाईक, ई-स्कूटर आणि ई-कार्गो बाइक्स चार्ज करण्याचा पर्याय असेल. या स्टेशनवर एकाच वेळी 4 दुचाकी चार्ज केल्या जाऊ शकतील.
सर्वोटेक पॉवर सिस्टीम्सचा शेअर सोमवारी 4 टक्क्यांनी वधारला आणि 189.67 रुपयांवर पोहोचला. हा स्मॉल कॅप शेअर 183.60 रुपयांवर वृद्धीसह खुला झाला होता. अर्थात हा शेअर कंपनीच्या 205.40 रुपयांच्या विक्रमी उच्चांकाच्या अगदी जवळ पोहोचला आहे. कंपनीचा शेअर या पातळीवर 26 सप्टेंबर रोजी होता.
(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)