Lokmat Money >शेअर बाजार > सलग 8 दिवसांपासून क्रॅश होतोय हा चर्चित शेअर, गुंतवणूकदारांचं टेन्शन वाढलं!

सलग 8 दिवसांपासून क्रॅश होतोय हा चर्चित शेअर, गुंतवणूकदारांचं टेन्शन वाढलं!

शेअरमध्ये मोठी घसरण होण्याचा हा सलग आठवा ट्रेडिंग दिवस आहे...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2025 17:04 IST2025-01-15T17:03:46+5:302025-01-15T17:04:24+5:30

शेअरमध्ये मोठी घसरण होण्याचा हा सलग आठवा ट्रेडिंग दिवस आहे...

Share market kalyan jewellers stock extends fall 8th straight day stock slips above 25 percent detail is here | सलग 8 दिवसांपासून क्रॅश होतोय हा चर्चित शेअर, गुंतवणूकदारांचं टेन्शन वाढलं!

सलग 8 दिवसांपासून क्रॅश होतोय हा चर्चित शेअर, गुंतवणूकदारांचं टेन्शन वाढलं!

शेअर बाजारात गेल्या काही दिवसांपासून कल्याण ज्वेलर्स इंडियाचे शेअर्स दबावाखाली आहेत. बुधवारी, आठवड्याच्या तिसऱ्या व्यावहाराच्या दिवशी, कंपनीच्या शेअर्सच्या किमतींत पुन्हा एकदा घसरण दिसून आली. दिवसाच्या व्यवहारात हा शेअर १० टक्क्यांहून अधिक घसरून ५२२.७५ रुपयांच्या नीचांकी पातळीवर आला. शेअरमध्ये मोठी घसरण होण्याचा हा सलग आठवा ट्रेडिंग दिवस आहे. २ जानेवारी २०२५ रोजी हा स्टॉक ७९४.६० रुपयांच्या विक्रमी पातळीवर पोहोचला होता.

शेयरचा परफॉर्मन्स -
कल्याण ज्वैलर्सचे बाजार मूल्य गेल्या दोन कॅलेंडर वर्षांत दुपटीहून अधिक झाले आहे.  कॅलेंडर वर्ष 2024 (CY24) मध्ये हा शेअर 116 टक्क्यांनी वधारला. तर कॅलेंडर वर्ष 2023 मध्ये तो 180 टक्क्यांनी वधारला. याच्या तुलनेत बीएसई सेंसेक्स कॅलेंडर वर्ष 2023 मध्ये 20 टक्के तर कॅलेंडर वर्ष 2024 मध्ये 9 टक्के वधारला आहे.

शेअरहोल्डिंग पॅटर्न -
डिसेंबर 2024 तिमाहीतील शेअरहोल्डिंग पॅटर्न डेटानुसार कल्याण ज्वैलर्सचा परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी कंपनीतील आपला वाटा 1 टक्क्यांनी कमी करून 15.75 टक्के केला आहे. सप्टेंबर तिमाहीच्या अखेरीस एफपीआयकडे 16.37 टक्के हिस्सेदारी होती. तर कंपनीतील निवासी वैयक्तिक भागधारकांचा वाटा ६.०८ टक्क्यांवरून ६.४७ टक्क्यांपर्यंत वाढला आहे.

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)
 

Web Title: Share market kalyan jewellers stock extends fall 8th straight day stock slips above 25 percent detail is here

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.