शेअर बाजारात इंटरअर्क बिल्डिंग प्रॉडक्ट्सच्या शेअरमध्ये गेल्या दोन दिवसांपासून तेजी दिसून येत आहे. या दोन व्यवहारांच्या दिवसांत कंपनीच्या शेअरची किंमत 13 टक्क्यांहून अधिक वाधारली आहे. आज अर्थात मंगळवारी कंपनीचा शेअर 11 टक्क्यांहून अधिक वधारला आहे.
या सिव्हील कंस्ट्रक्शन कंपनीचा शेअर आज बीएसईमध्ये 1699.95 रुपयांच्या पातळीवर खुला झाला. यानंतर 11 टक्क्यांहून अधिकच्या वाढीसह हा शेअर 1884.05 रुपयांवर पोहोचला. हा कंपनीचा 52 आठवड्यांचा उच्चांक आहे. तर, नीचांक 1110.65 रुपये एवढा आहे.
लिस्टिंगपासून 107% ने वधारलाय भाव -
कंपनीचे शेअर्स आज टिस्टिंग झाल्यापासूनच्या आपल्या सर्वोच्च पातळीवर आहेत. लिस्टिंग झाल्यापासून कंपनीच्या शेअर्सच्या किमतीत 107 टक्क्यांनी वाढ झाली आहे. यामुळे स्थिर गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट झाले आहेत. इंटरआर्क बिल्डिंग प्रोडक्ट्सची इश्यू प्राईस 900 रुपये प्रति शेअर होती. 26 ऑगस्ट 2024 रोजी कंपनी BSE वर सूचीबद्ध झाली आहे.
कंपनीची स्थिती -
इंटरआर्क बिल्डिंग प्रोडक्ट्स लिमिटेडने जाहीर केलेल्या निकालांनुसार, जून तिमाहीत एकूण निव्वळ नफा 20.30 कोटी रुपये होता. तर, एका वर्षापूर्वी याच तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा 19.40 कोटी रुपये होता. कंपनीच्या निव्वळ नफ्यात वार्षिक आधारावर 5 टक्क्यांनी वाढ झाली आहे. एप्रिल ते जून 2024 दरम्यान कंपनीचा निव्वळ महसूल 303.40 कोटी रुपये एवढा होता. कंपनीच्या निव्वळ महसुलात वार्षिक आधारावर 3 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)