Lokmat Money >शेअर बाजार > तिमाही निकाल सकारात्मक असूनही इन्फोसिस शेअर्समध्ये मोठी घसरण; गुंतवणूकदारांनी काय करावं?

तिमाही निकाल सकारात्मक असूनही इन्फोसिस शेअर्समध्ये मोठी घसरण; गुंतवणूकदारांनी काय करावं?

Infosys Share Price : आयटी टेक कंपनी इन्फोसिसने नुकतेच आपले तिमाही निकाल जाहीर केले. निकाल चांगले असूनही शेअर्स आपटले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2025 12:22 IST2025-01-17T12:22:10+5:302025-01-17T12:22:43+5:30

Infosys Share Price : आयटी टेक कंपनी इन्फोसिसने नुकतेच आपले तिमाही निकाल जाहीर केले. निकाल चांगले असूनही शेअर्स आपटले आहे.

share market infosys shares tank 5 percent on q4 growth worries despite solid q3 earnings | तिमाही निकाल सकारात्मक असूनही इन्फोसिस शेअर्समध्ये मोठी घसरण; गुंतवणूकदारांनी काय करावं?

तिमाही निकाल सकारात्मक असूनही इन्फोसिस शेअर्समध्ये मोठी घसरण; गुंतवणूकदारांनी काय करावं?

Infosys Share Price : तरुणांना आठवड्यात ७० तास काम करण्याचा सल्ला देणाऱ्या नारायण मूर्ती यांच्या इन्फोसिस कंपनीचा शेअर पुन्हा एकदा तोंडावर आपटला. बुधवारच्या तुलनेत आज हा आयटी शेअर कमजोरीने उघडला. NSE वर सुरुवातीच्या व्यवहारात तो ६ टक्क्यांनी घसरून १८१६ रुपयांवर आला. न्यू यॉर्क स्टॉक एक्सचेंज (NYSE) वर सूचीबद्ध असलेल्या इन्फोसिसच्या अमेरिकन डिपॉझिटरी रिसिप्ट्स (ADRs) मध्ये ६% घट झाल्यानंतर ही घसरण झाली. ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीचे निकाल अपेक्षेपेक्षा चांगले आहेत. असे असूनही इन्फोसिसच्या समभागांमध्ये घसरण होण्याचे मुख्य कारण म्हणजे चौथ्या तिमाहीत कंपनीच्या महसुलातील वाढ कमकुवत राहण्याची शक्यता आहे.

इन्फोसिसचे २०२५ च्या तिसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर झाल्यानंतर, NYSE वर Infosys ADR च्या किमतीत मोठ्या प्रमाणात विक्रीचा दबाव दिसून आला. याचा अर्थ अमेरिकन गुंतवणूकदार निकालावर समाधी नसल्याचे स्पष्ट होत आहे. याचा परिणाम शुक्रवारी बाजार उघडताच पाहायला मिळाला. पण, डिसेंबर तिमाहीच्या निकालानंतर कंपनीवर लक्ष ठेवून असलेल्या बहुतांश विश्लेषकांच्या IT समभागांमध्ये इन्फोसिस लि. हा सर्वात आवडता शेअर आहे. कंपनीने सलग तिसऱ्या तिमाहीत चांगली कमाई केली.

गुंतवणूकदारांनी काय करावं?
इन्फोसिसला आता आर्थिक वर्ष २०२५ मध्ये महसूल ४.५% ते ५% च्या दरम्यान वाढण्याची अपेक्षा आहे. जे आधीच्या ३.७५% ते ४.५% च्या अंदाजापेक्षा जास्त आहे. EBIT मार्जिन २०% ते २२% वर राखले गेले. बहुतेक इतर मापदंड एकतर अपेक्षेनुसार किंवा अपेक्षेपेक्षा कमी होते. इन्फोसिस कव्हर करणाऱ्या ४७ तज्ञांपैकी ७०%  लोकांनी शेअर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तर ९ जणांनी ‘होल्ड’ रेटिंग दिले आहे, तर पाच जणांनी ‘सेल’ असा सल्ला दिला आहे.

पगारवाढीबाबत अनिश्चितता
सुट्ट्यांमुळे कामाचे दिवस कमी झाले असून थर्ट पार्टी कमाईतील घट ही प्रमुख आव्हाने सांगितली आहे. यासोबतच पगारवाढीच्या परिणामाबाबतही अनिश्चितता आहे. कंपनीने पगारवाढीचा पहिला टप्पा १ जानेवारी रोजी लागू केला असून दुसरा टप्पा १ एप्रिलपासून लागू होणार आहे. याचा परिणाम आगामी काळात दिसेल, असं मत व्यवस्थापनाने व्यक्त केलं आहे.
 

Web Title: share market infosys shares tank 5 percent on q4 growth worries despite solid q3 earnings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.