Lokmat Money >शेअर बाजार > या शेअरनं गुंतवणूकदारांना रातोरात बनवलं होतं करोडपती, ₹10000 चे केले होते ₹67 कोटी!

या शेअरनं गुंतवणूकदारांना रातोरात बनवलं होतं करोडपती, ₹10000 चे केले होते ₹67 कोटी!

विशेष कॉल लिलावापूर्वी, 21 जून, 2024 रोजी हा शेअर बीएसईवर 3.53 रुपयांवर बंद झाला होता. अर्थात जर एखाद्या गुंतवणूकदाराने 3.53 रुपयांनुसार कंपनीमध्ये 10000 रुपयांची गुंतवणूक केली असती, तर ऑक्टोबरमध्ये त्याचे 67 कोटी रुपये झाले असते.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2024 17:45 IST2024-12-25T17:44:34+5:302024-12-25T17:45:24+5:30

विशेष कॉल लिलावापूर्वी, 21 जून, 2024 रोजी हा शेअर बीएसईवर 3.53 रुपयांवर बंद झाला होता. अर्थात जर एखाद्या गुंतवणूकदाराने 3.53 रुपयांनुसार कंपनीमध्ये 10000 रुपयांची गुंतवणूक केली असती, तर ऑक्टोबरमध्ये त्याचे 67 कोटी रुपये झाले असते.

Share market elcid investments stock made investors millionaires overnight, turning rs 10,000 into rs 67 crore | या शेअरनं गुंतवणूकदारांना रातोरात बनवलं होतं करोडपती, ₹10000 चे केले होते ₹67 कोटी!

या शेअरनं गुंतवणूकदारांना रातोरात बनवलं होतं करोडपती, ₹10000 चे केले होते ₹67 कोटी!

शेअर बाजारातील एल्साइड इन्व्हेस्टमेंटचा शेअर (Elcid Investments Share) हा या वर्षातील सर्वाधिक चर्चित शेअर्सपैकी एक ठरला. या शेअरने अचानक आपल्या गुंतवणूकदारांना कोट्यधीश बनवले. हा शेअर 29 ऑक्टोबर रोजी अचानक 66,92,535% वधारला आणि 2 लाख 36 हजार रुपयांच्याही पार पोहोचला. यापूर्वी जुलै महिन्यात या शेअरची किंमत सुमारे 3 रुपये एवढी होती. दरम्यान, शेअरची किंमत जाणून घेण्यासाठी 29 ऑक्टोबरपासून विशेष कॉल लिलावाचे आयोजन करण्यात आले होते. त्याच दिवशी Elcid Investments Limited चा शेअर ट्रेडिंग दरम्यान 2,36,250 रुपयांवर पोहोचला होता.

विशेष कॉल लिलावापूर्वी, 21 जून, 2024 रोजी हा शेअर बीएसईवर 3.53 रुपयांवर बंद झाला होता. अर्थात जर एखाद्या गुंतवणूकदाराने 3.53 रुपयांनुसार कंपनीमध्ये 10000 रुपयांची गुंतवणूक केली असती, तर ऑक्टोबरमध्ये त्याचे 67 कोटी रुपये झाले असते.

कंपनीचा कारभार -
एल्सिड इन्व्हेस्टमेंट्स ही भारतीय रिझर्व्ह बँकेसोबत (RBI) रजिस्टर्ड एक गैर-बैंकिंग वित्तीय कंपनी (NBFC) म्हणून काम करते. सध्या कंपनीचा कुठलाही ऑपरेटिंग व्यवसाय नाही. मात्र, एशियन पेंट्स इत्यादीसारख्या इतर मोठ्या कंपन्यांमध्ये लक्षणीय गुंतवणूक आहे. उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत म्हणजे त्याच्या होल्डिंग कंपन्यांकडून मिळणारा लाभांश. या कंपनीचे मार्केट कॅप 3,829.58 कोटी रुपये आहे. हा शेअर 8 नोव्हेंबर रोजी बीएसईवर 3,30,473.35 रुपयांच्या शिखरावर पोहोचला होता. ही त्याची 52 आठवड्यांची सर्वोच्च किंमत आहे.

सप्टेंबर तिमाहीचा निकाल - 
Elcid Investments च्या शेअरने गेल्या आठवड्यात सप्टेंबर तिमाहीचे निकाल जाहीर केले. सप्टेंबर तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा ₹43.47 कोटी होता, जो गेल्या वर्षीच्या तुलनेत 179.37% अधिक आहे. कंपनीचा महसूल 149.62% ने वाढून ₹56.34 कोटी झाला आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीने ₹15.56 कोटी निव्वळ नफा आणि ₹22.57 कोटी कमाई केली होती. या तिमाहीत कंपनीचे डिविडेंड उत्पन्न 19.47% ने वाढून ₹2.27 कोटी झाले आहे. त्याचे व्याज उत्पन्न 57.35% ने वाढून ₹7.27 लाख झाले. 

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)
 
Web Title: Share market elcid investments stock made investors millionaires overnight, turning rs 10,000 into rs 67 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.