Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money >शेअर बाजार > बाजार 'क्रॅश'! ३० पैकी २५ शेअर्स लाल निशाणात; रिलायन्सचा आधार मिळाला, पण पडझड रोखण्यात अपयश

बाजार 'क्रॅश'! ३० पैकी २५ शेअर्स लाल निशाणात; रिलायन्सचा आधार मिळाला, पण पडझड रोखण्यात अपयश

Stock Market Highlights : सोमवारी, बीएसई सेन्सेक्स १३५२.७४ अंकांनी (१.७१ टक्के) घसरून ७७,५६६.१६ अंकांवर बंद झाला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2026 16:30 IST2026-03-09T16:30:12+5:302026-03-09T16:30:12+5:30

Stock Market Highlights : सोमवारी, बीएसई सेन्सेक्स १३५२.७४ अंकांनी (१.७१ टक्के) घसरून ७७,५६६.१६ अंकांवर बंद झाला.

Sensex Crashes 1,352 Points Indian Stock Market Records Sharp Fall Amid Middle East Crisis | बाजार 'क्रॅश'! ३० पैकी २५ शेअर्स लाल निशाणात; रिलायन्सचा आधार मिळाला, पण पडझड रोखण्यात अपयश

बाजार 'क्रॅश'! ३० पैकी २५ शेअर्स लाल निशाणात; रिलायन्सचा आधार मिळाला, पण पडझड रोखण्यात अपयश

Stock Market Highlights : मध्यपूर्वेतील युद्धाचे ढग गडद झाल्याने जागतिक बाजारासह भारतीय शेअर बाजारातही सोमवारी भीषण पडझड पाहायला मिळाली. सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांनी चौफेर विक्रीचा सपाटा लावल्याने 'बीएसई' सेन्सेक्स १३५२.७४ अंकांनी (१.७१%) कोसळून ७७,५६६.१६ वर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा 'निफ्टी-५०' देखील ४२२.४० अंकांच्या (१.७३%) मोठ्या घसरणीसह २४,०२८.०५ वर स्थिरावला.

व्यवहारादरम्यान एका वेळी सेन्सेक्सने ७६,४२४.५५ आणि निफ्टीने २३,६९७.८० पर्यंतचा निचांक गाठला होता, ज्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

३० पैकी २५ कंपन्या 'लाल' निशाणात
बाजारातील घसरणीचा जोर इतका प्रचंड होता की, सेन्सेक्समधील ३० पैकी तब्बल २५ कंपन्यांचे शेअर्स घसरणीसह बंद झाले. केवळ ५ कंपन्यांनाच आपली मान वर काढता आली. निफ्टी-५० ची स्थितीही काही वेगळी नव्हती; तेथील ५० पैकी ४२ शेअर्स तोट्यात राहिले, तर केवळ ८ शेअर्सनी हिरवे निशाण राखले.

आजचे टॉप गेनर्स आणि लूझर्स
सर्वात जास्त वाढ : रिलायन्स इंडस्ट्रीज (१.३७%)
सर्वात जास्त घसरण : अल्ट्राटेक सिमेंट (५.२३%)

क्षेत्रीय कामगिरीवर युद्धाचे सावट
युद्धाच्या परिस्थितीमुळे वाहन, बँकिंग आणि पोलाद क्षेत्रातील कंपन्यांना सर्वाधिक फटका बसला आहे.

  • वाहन उद्योग : मारुती सुझुकी (४.६८%) आणि महिंद्रा अँड महिंद्रा (४.३९%) यांच्या शेअर्समध्ये मोठी पडझड झाली.
  • बँकिंग क्षेत्र : एसबीआय (३.९२%), कोटक बँक (३.४८%), आयसीआयसीआय बँक (२.७४%) आणि एचडीएफसी बँक (२.०९%) यांसारख्या दिग्गज बँकांचे शेअर्सही गडगडले.
  • इतर प्रमुख पडझड : इंडिगो (३.८३%), अदानी पोर्ट्स (३.७५%), टाटा स्टील (३.७५%) आणि एशियन पेंट्स (२.७५%) या कंपन्यांनीही गुंतवणूकदारांची निराशा केली.

वाचा - सेन्सेक्स-निफ्टी उच्चांकावरून १०% कोसळले! गुंतवणूकदारांचे लाखो कोटी पाण्यात; अशा स्थितीत काय करावे?

मंदीच्या लाटेतही 'या' शेअर्सनी टिकवला दम
बाजारात चौफेर विक्री सुरू असतानाही आयटी क्षेत्रातील काही कंपन्यांनी किरकोळ वाढ नोंदवली. यामध्ये इन्फोसिस (०.४७%), एचसीएल टेक (०.४५%), सन फार्मा (०.१७%) आणि टेक महिंद्रा (०.०९%) यांचा समावेश होता.

Web Title : बाजार क्रैश! रिलायंस का समर्थन व्यापक नुकसान को रोकने में विफल

Web Summary : मध्य पूर्व तनाव के बीच भारतीय शेयर बाजार में गिरावट आई। सेंसेक्स में भारी गिरावट, ज्यादातर शेयर लाल निशान में। रिलायंस ने कुछ समर्थन दिया, लेकिन बाजार में गिरावट को नहीं रोक पाया, जिसका असर विभिन्न क्षेत्रों पर पड़ा।

Web Title : Market Crash! Reliance Support Fails to Stop Widespread Losses

Web Summary : Indian stock markets crashed amid Middle East tensions. Sensex fell sharply, with most shares in red. Reliance offered some support, but couldn't prevent the overall market decline, impacting various sectors.