Sebi Big Action: भारतीय बाजार नियामक सेबीनं जेन स्ट्रीट ग्रुप आणि त्याच्याशी संबंधित कंपन्या जेएसआय इन्व्हेस्टमेंट प्रायव्हेट लिमिटेड, जेएसआय २ इन्व्हेस्टमेंट प्रायव्हेट लिमिटेड, जेन स्ट्रीट सिंगापूर प्रायव्हेट लिमिटेड आणि जेन स्ट्रीट एशिया ट्रेडिंग लिमिटेड यांना शेअर बाजारात व्यवहार करण्यास मनाई करणारा महत्त्वपूर्ण आदेश जारी केला. सेबीनं गुरुवार ३ जुलै रोजी हा आदेश दिला.
सेबीच्या म्हणण्यानुसार, या कंपन्यांना यापुढे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे शेअर्सखरेदी, विक्री किंवा कोणत्याही प्रकारचे व्यवहार करता येणार नाहीत.
४ टक्के वाढू शकतो कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता; मोदी सरकार देऊ शकते मोठं गिफ्ट
बेकायदेशील नफा जप्त होणार
सीएनबीसी-टीव्ही १८ नं दिलेल्या वृत्तानुसार, सेबीनं आपल्या आदेशात म्हटलंय की, जेन स्ट्रीट ग्रुपनं कमावलेला ४,८४३ कोटी रुपयांचा बेकायदेशीर नफा जप्त केला जाईल. ही रक्कम भारतातील मान्यताप्राप्त बँकेतील एस्क्रो खात्यात जमा करण्याच्या सूचना कंपन्यांना देण्यात आल्या आहेत. तसंच जेन स्ट्रीटच्या बँक खात्यातून पैसे काढण्यावरही बंदी घालण्यात आली आहे. सेबीच्या परवानगीशिवाय कोणताही व्यवहार होणार नाही.
तीन महिन्यांची मुदत
जेन स्ट्रीटला पुढील तीन महिन्यांत किंवा त्यांची डेडलाइन संपेपर्यंत, जे आधी असेल तेव्हा ओपन ट्रेडिंग पोझिशन्स बंद कराव्या लागतील. म्हणजेच कंपनीला आपले सर्व प्रलंबित व्यवहार पूर्ण करावे लागतील.
कॅश इक्विव्हॅलंट म्हणजे काय?
फ्युचर्स अँड ऑप्शन्स (एफ अँड ओ) ट्रेडिंगमध्ये, "कॅश इक्विव्हॅलंट" म्हणजे अशा वस्तू ज्या सहजपणे रोखीत रूपांतरित केल्या जाऊ शकतात, जसं की अल्पमुदतीच्या गुंतवणुका. व्यापारी त्याचा वापर अनेकदा तारण म्हणून किंवा मार्जिन म्हणून करतात. यामुळे त्यांना व्याज मिळविण्याची संधी मिळते आणि त्याच वेळी ते एफ अँड ओमध्ये व्यवहार करण्यास सक्षम असतात. झेन स्ट्रीटवर या पद्धतींचा गैरवापर करून बाजारात फेरफार केल्याचा आरोप आहे.