Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money >शेअर बाजार > सेबीची अवधूत साठे यांच्यावर सर्वात मोठी कारवाई! ५४६ कोटींची संपत्ती जप्तीचे आदेश, काय आहे प्रकरण?

सेबीची अवधूत साठे यांच्यावर सर्वात मोठी कारवाई! ५४६ कोटींची संपत्ती जप्तीचे आदेश, काय आहे प्रकरण?

Avadhut Sathe Latest News : भारताच्या शेअर बाजार नियामक सेबीने फिनइन्फ्लुएंसर अवधूत साठे यांच्यावर आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2025 09:59 IST2025-12-05T09:56:08+5:302025-12-05T09:59:03+5:30

Avadhut Sathe Latest News : भारताच्या शेअर बाजार नियामक सेबीने फिनइन्फ्लुएंसर अवधूत साठे यांच्यावर आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई केली आहे.

SEBI Bans Finfluencer Avadhut Sathe, Orders Impounding of ₹546 Crore in Unlawful Gain | सेबीची अवधूत साठे यांच्यावर सर्वात मोठी कारवाई! ५४६ कोटींची संपत्ती जप्तीचे आदेश, काय आहे प्रकरण?

सेबीची अवधूत साठे यांच्यावर सर्वात मोठी कारवाई! ५४६ कोटींची संपत्ती जप्तीचे आदेश, काय आहे प्रकरण?

Who is Avadhut Sathe : तुम्ही जर शेअर बाजारातूगुंतवणूक करत असाल तर फिनइन्फ्लुएंसर अवधूत साठे हे नाव तुम्ही नक्कीच ऐकलं असेल. शेअर बाजाराची नियामक संस्था असलेल्या 'सेबी'ने अवधूत साठे यांच्यावर आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई केली आहे. सेबीने साठे आणि त्यांच्या कुटुंबियांना सिक्युरिटीज मार्केटमधून पूर्णपणे निलंबित केले असून, सुमारे ५४६ कोटी रुपयांची कथित अनलॉफुल गेन जप्त करण्याचे आदेश दिले आहेत.

सेबीचा मुख्य आरोप आहे की, साठे यांच्याकडे कोणताही नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार किंवा रिसर्च ॲनलिस्ट परवाना नसतानाही, शिक्षण अभ्यासक्रमांच्या नावाखाली स्टॉक मार्केट कॉल्स दिले आणि भ्रामक दावे करून गुंतवणूकदारांची दिशाभूल केली.

कोण आहेत अवधूत साठे?
अवधूत साठे हे एक प्रसिद्ध फिनइन्फ्लुएंसर आणि 'अवधूत साठे ट्रेडिंग ॲकॅडमी'चे संस्थापक आहेत. २०१७ साली त्यांनी ही ॲकॅडमी सुरू केली होती. या माध्यमातून ते ट्रेडिंग व गुंतवणुकीशी संबंधित अनेक कोर्स विकत होते. या कोर्सची फी काहीशे रुपयांच्या इंट्रो क्लासपासून ते लाखो रुपयांच्या 'हाय-एंड मेंटरशिप' प्रोग्रामपर्यंत होती.

सेबीच्या कारवाईची प्रमुख कारणे
सेबीच्या आदेशानुसार, या अभ्यासक्रमांच्या माध्यमातून 'रिअल-टाईम ट्रेडिंग रिकमेंडेशन्स' दिले जात होते. या गोष्टी करण्यासाठी तुम्ही 'नोंदणीकृत सल्लागार' असणे आवश्यक आहे. मात्र, असा कोणताही परवाना साठे यांच्याकडे नाही. सेबीच्या अंदाजानुसार, या सर्व गतिविधीतून सुमारे ६०० कोटींची कमाई झाली, त्यापैकी ५४६ कोटी रुपयांचे कागदोपत्री पुरावे मिळाल्याने ही रक्कम तातडीने जप्त करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

सोशल मीडिया आणि मार्केटिंगमध्ये खोट्या किंवा भ्रामक यशाच्या कथा दाखवण्यात आल्या. 'लाखो रुपये कमावल्याचे' दावे करणाऱ्या ग्राहकांच्या खात्यांचे विश्लेषण केले असता, त्यांच्या खात्यात प्रत्यक्षात तोटा झाला होता. सेबीने १८६ ग्राहकांच्या ट्रेड डेटाची तपासणी केली, ज्यात सुमारे ६५ टक्के ग्राहकांनी कोर्स पूर्ण झाल्यानंतर सहा महिन्यांच्या आत एकत्रितपणे १.९३ कोटी रुपयांचा निव्वळ तोटा सहन केला होता.

वाचा - 'रोलेक्स'ला जगभरात इतकी मागणी का? ४-५ वर्षांचा वेटींग परियड? ९९% लोकांना कारण माहिती नसेल

कारवाईचा अर्थ
सेबीच्या या कठोर कारवाईमुळे हे स्पष्ट होते की, शिक्षण आणि नोंदणी नसलेला गुंतवणूक सल्ला यातील रेषा पुसट करणाऱ्या फिनइन्फ्लुएन्सर्सना आता बाजारात कठोर नियमांचा सामना करावा लागणार आहे. ५४६ कोटींची रक्कम जप्त करण्याचा हा आदेश, नोंदणी नसलेल्या सल्लागारांवर केलेली आजवरची सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे.

Web Title : सेबी की अवधूत साठे पर बड़ी कार्रवाई, ₹546 करोड़ की संपत्ति जब्त

Web Summary : सेबी ने फिनइन्फ्लुएंसर अवधूत साठे पर बिना पंजीकरण निवेश सलाह देने पर ₹546 करोड़ की संपत्ति जब्त की। साठे ने बिना लाइसेंस के स्टॉक मार्केट कॉल से निवेशकों को गुमराह किया। अधिकांश ग्राहकों को कोर्स के बाद नुकसान हुआ।

Web Title : SEBI Cracks Down on Avadhut Sathe, Seizes ₹546 Crore Assets

Web Summary : SEBI penalizes fininfluencer Avadhut Sathe for unregistered investment advice, seizing ₹546 crore. He misled investors with stock market calls without proper licenses. SEBI found false success claims; most clients incurred losses post-course.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.