Adani Stocks: देशातील आघाडीच्या उद्योग समूहांपैकी एक असलेल्या Adani Group च्या शेअर्समध्ये बुधवारी मोठी तेजी पाहायला मिळाली. समूहातील काही शेअर्समध्ये १३ टक्क्यांपर्यंत वाढ झाली असून, यामुळे कंपनीच्या एकूण मार्केट कॅपमध्ये सुमारे ९६ हजार कोटी रुपयांची भर पडली आहे.
प्रमुख शेअर्समध्ये मोठी वाढ
Adani Green Energy : सुमारे १३% वाढ, शेअर १,०४६ रुपयांवर
Adani Enterprises : ११% वाढ, शेअर २,०९० रुपयांवर
Adani Ports : ८% पेक्षा अधिक वाढ
याशिवाय Adani Energy Solutions, Adani Power, Adani Total Gas, ACC Limited आणि Ambuja Cements यांच्या शेअर्समध्येही सुमारे ८% पर्यंत वाढ झाली.
युद्धविरामाचा सकारात्मक प्रभाव
अमेरिका-इराण युद्धविरामाच्या घोषणेमुळे जागतिक बाजारात सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः Adani Ports ला याचा फायदा झाला, कारण समूहाकडे इस्रायलमधील Haifa Port चे मालकी हक्क आहेत. या पोर्टची २०२२ मध्ये १.१३ अब्ज डॉलरमध्ये खरेदी करण्यात आली होती.
SEC प्रकरणात न्यायालयाचा दिलासा
Adani Group ने अमेरिकेतील U.S. Securities and Exchange Commission (SEC) च्या सिव्हिल फ्रॉड प्रकरणाला आव्हान देत न्यायालयात धाव घेतली होती. या संदर्भात अमेरिकन न्यायालयाने प्री-मोशन कॉन्फरन्ससाठी समूहाची विनंती मान्य केली आहे. नोव्हेंबर २०२४ मध्ये SEC ने गौतम अदानी आणि त्यांचे पुतणे सागर अदाणी यांच्यावर सौर ऊर्जा प्रकल्पांसाठी भारतीय अधिकाऱ्यांना लाच देण्याच्या कटाचा आरोप केला होता. या सर्व घडामोडीमुळे गुंतवणूकदारांचा समूहावरील विश्वास वाढल्याचे दिसून येत आहे.
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
