Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money >शेअर बाजार > ७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी

७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी

RPSG Ventures Share: सोमवारी बीएसई (BSE) मध्ये इंट्राडे दरम्यान या कंपनीचे शेअर्स ८ टक्क्यांहून अधिक उसळीसह ११२७.६० रुपयांवर पोहोचले. या जबरदस्त वाढीमुळे कंपनीच्या शेअर्सनी ५२ आठवड्यांचा आपला नवीन उच्चांक गाठला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2026 15:35 IST2026-04-06T15:34:16+5:302026-04-06T15:35:03+5:30

RPSG Ventures Share: सोमवारी बीएसई (BSE) मध्ये इंट्राडे दरम्यान या कंपनीचे शेअर्स ८ टक्क्यांहून अधिक उसळीसह ११२७.६० रुपयांवर पोहोचले. या जबरदस्त वाढीमुळे कंपनीच्या शेअर्सनी ५२ आठवड्यांचा आपला नवीन उच्चांक गाठला आहे.

RPSG Ventures stock doubled in 7 days Price increased by more than 100 percent the company owns the IPL team | ७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी

७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी

RPSG Ventures Share: आरपी संजीव गोयनका ग्रुपची कंपनी असलेल्या आरपीएसजी व्हेंचर्स लिमिटेडच्या शेअर्समध्ये मोठी वाढ पाहायला मिळत आहे. सोमवारी बीएसई (BSE) मध्ये इंट्राडे दरम्यान या कंपनीचे शेअर्स ८ टक्क्यांहून अधिक उसळीसह ११२७.६० रुपयांवर पोहोचले. या जबरदस्त वाढीमुळे कंपनीच्या शेअर्सनी ५२ आठवड्यांचा आपला नवीन उच्चांक गाठला आहे. विशेष म्हणजे ही कंपनी आयपीएलमधील लखनौ सुपर जायंट्स या संघाची मालक आहे.

सात दिवसांत गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट

आरपीएसजी व्हेंचर्सच्या शेअर्समध्ये गेल्या सात ट्रेडिंग सेशन्समध्ये १०० टक्क्यांहून अधिक वाढ नोंदवण्यात आली आहे. २३ मार्च २०२६ रोजी कंपनीच्या एका शेअरची किंमत ५५७.२५ रुपये होती, जी ६ एप्रिल २०२६ पर्यंत ११२७.६० रुपयांवर जाऊन पोहोचली. युनायटेड स्पिरिट्स लिमिटेडनं (USL) आपली उपकंपनी असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) या आयपीएल फ्रँचायझीला १६,६०० कोटी रुपयांहून अधिक किमतीत विकण्याची घोषणा केल्यावर आरपीएसजी व्हेंचर्सच्या शेअरमध्ये ही तेजी आली आहे. सोमवार ६ एप्रिल रोजी कंपनीचे एकूण मार्केट कॅप ३६७० कोटी रुपयांच्या पार गेलं.

ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ

आशिष धवन यांची मोठी गुंतवणूक

शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार आशिष धवन यांनी या कंपनीवर मोठा डाव लावला आहे. डिसेंबर २०२५ च्या तिमाहीतील आकडेवारीनुसार, धवन यांच्याकडे आरपीएसजी व्हेंचर्सचे १२,३४,२८६ शेअर्स असून कंपनीमध्ये त्यांची ३.७३ टक्के इतकी मोठी भागीदारी आहे. कंपनीच्या एकूण भांडवलात प्रवर्तकांचा हिस्सा ६३.५१ टक्के आहे, तर उर्वरित ३६.४९ टक्के हिस्सा सार्वजनिक गुंतवणूकदारांकडे आहे.

किमतीतील बदलाबाबत कंपनीचं स्पष्टीकरण

शेअर्सच्या किमतीत अचानक आलेल्या या मोठ्या उसळीबाबत स्टॉक एक्सचेंजने कंपनीकडून स्पष्टीकरण मागितलं होतं. यावर उत्तर देताना कंपनीने सांगितले की, शेअर्सच्या किमतीतील ही हालचाल पूर्णपणे बाजार आधारित असून कंपनी सध्या या बदलाचे कोणतेही ठोस कारण सांगण्याच्या स्थितीत नाही. आरपीएसजी व्हेंचर्सची आरपीएसजी स्पोर्ट्समध्ये ५१ टक्के भागीदारी आहे, ज्यांच्याकडे लखनऊ सुपर जायंट्सची मालकी आहे, तर उर्वरित ४९ टक्के हिस्सा समूहाच्या एका अनलिस्टेड कंपनीकडे आहे.

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title : आरपीएसजी वेंचर्स का शेयर एक सप्ताह में दोगुना; आईपीएल टीम का मालिक।

Web Summary : आरपीएसजी वेंचर्स के शेयर की कीमत एक सप्ताह में दोगुनी हो गई, जो 52 सप्ताह के उच्च स्तर पर पहुंच गई। कंपनी लखनऊ सुपर जायंट्स आईपीएल टीम की मालिक है। आशीष धवन की बड़ी हिस्सेदारी है। कंपनी ने कहा कि यह उछाल बाजार संचालित है।

Web Title : RPSG Ventures share doubles in a week; IPL team owner.

Web Summary : RPSG Ventures' share price doubled in a week, hitting a 52-week high. The company owns the Lucknow Super Giants IPL team. Ashish Dhawan holds a significant stake. The company stated the surge is market-driven.