Lokmat Money >शेअर बाजार > १ लाख रुपयांचे झाले ५५ लाख; अनिल अंबानींच्या कंपनीचे शेअर्स नव्या उच्चांकी स्तरावर, तुमच्याकडे आहे का?

१ लाख रुपयांचे झाले ५५ लाख; अनिल अंबानींच्या कंपनीचे शेअर्स नव्या उच्चांकी स्तरावर, तुमच्याकडे आहे का?

कंपनीच्या शेअर्समध्ये ५४०० टक्क्यांहून अधिक वाढ झालीये. कंपनीच्या शेअर्सनी एक लाख रुपयांच्या गुंतवणुकीचे रुपांतर ५५ लाख रुपयांपेक्षा अधिक केलंय.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 13:02 IST2025-06-09T13:01:08+5:302025-06-09T13:02:21+5:30

कंपनीच्या शेअर्समध्ये ५४०० टक्क्यांहून अधिक वाढ झालीये. कंपनीच्या शेअर्सनी एक लाख रुपयांच्या गुंतवणुकीचे रुपांतर ५५ लाख रुपयांपेक्षा अधिक केलंय.

reliance power stock price anil ambani company 1 lakh becomes Rs 55 lakh stock hit new high do you have any | १ लाख रुपयांचे झाले ५५ लाख; अनिल अंबानींच्या कंपनीचे शेअर्स नव्या उच्चांकी स्तरावर, तुमच्याकडे आहे का?

१ लाख रुपयांचे झाले ५५ लाख; अनिल अंबानींच्या कंपनीचे शेअर्स नव्या उच्चांकी स्तरावर, तुमच्याकडे आहे का?

Reliance Power Stock: अनिल अंबानी यांची कंपनी रिलायन्स पॉवरच्या शेअर्समध्ये मोठी तेजी दिसून येत आहे. एका महिन्यात कंपनीच्या शेअर्समध्ये ६५ टक्क्यांहून अधिक वाढ झाली. सोमवारी एनएसईवर रिलायन्स पॉवरचा शेअर ४ टक्क्यांनी वधारून ६४.३७ रुपयांवर पोहोचला. रिलायन्स पॉवरचा शेअर ५२ आठवड्यांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला आहे. गेल्या ५ वर्षात रिलायन्स पॉवरच्या शेअर्समध्ये ५४०० टक्क्यांहून अधिक वाढ झालीये. पाच वर्षांत कंपनीच्या शेअर्सनी एक लाख रुपयांच्या गुंतवणुकीचे रुपांतर ५५ लाख रुपयांपेक्षा अधिक केलंय.

अनिल अंबानी यांच्या मालकीच्या रिलायन्स पॉवरचा शेअर २७ मार्च २०२० रोजी १.१५ रुपयांवर व्यवहार करत होता. कंपनीचा शेअर ९ जून २०२५ रोजी ६५.३७ रुपयांवर पोहोचला. गेल्या पाच वर्षांत रिलायन्स पॉवरचा शेअर ५४०० टक्क्यांहून अधिक वधारला आहे. जर एखाद्या व्यक्तीनं २७ मार्च २०२० रोजी कंपनीच्या शेअर्समध्ये १ लाख रुपयांची गुंतवणूक केली असती आणि आपली गुंतवणूक कायम ठेवली असती तर १ लाख रुपयांना खरेदी केलेल्या शेअर्सची सध्याची किंमत ५५.९३ लाख रुपये झाली असती.

भारतात पहिल्यांदाच MCX नं केलं असं काम की विक्रमी उच्चांकी स्तरावर पोहोचले शेअर्स, जाणून घ्या

२३०० टक्क्यांहून अधिक वाढ

रिलायन्स पॉवरच्या शेअरमध्ये गेल्या पाच वर्षांत २३०० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. १२ जून २०२० रोजी अनिल अंबानी यांच्या वीज कंपनीचा शेअर २.६० रुपयांवर होता. कंपनीचा शेअर ९ जून २०२५ रोजी ६४.३७ रुपयांवर पोहोचला. तर, रिलायन्स पॉवरच्या शेअर्समध्ये गेल्या चार वर्षांत ४१० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. गेल्या दोन वर्षांत कंपनीच्या शेअरमध्ये ३६० टक्क्यांहून अधिक वाढ झाली. तर गेल्या वर्षभरात कंपनीच्या शेअर्समध्ये १५० टक्क्यांहून अधिक वाढ झाली. रिलायन्स पॉवरच्या शेअरचा ५२ आठवड्यांतील नीचांकी स्तर २३.८५ रुपये आहे.

अनिल अंबानी समूहाची फ्लॅगशिप कंपनी असलेल्या रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरच्या शेअरनेही सोमवारी, ९ जून २०२५ रोजी ५२ आठवड्यांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचले. रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरचा शेअर सोमवारी ३८७ रुपयांवर पोहोचला. गेल्या पाच वर्षांत रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरचे शेअर्स १६४० टक्क्यांहून अधिक वाढले आहेत. कंपनीच्या शेअर्सचा ५२ आठवड्यांचा नीचांकी स्तर १६९.५१ रुपये आहे.

(टीप : यामध्ये केवळ शेअर्सच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: reliance power stock price anil ambani company 1 lakh becomes Rs 55 lakh stock hit new high do you have any

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.