Lokmat Money >शेअर बाजार > रिलायन्स जिओचा ५२,००० कोटींचा 'महा-आयपीओ'! मुकेश अंबानी आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडणार?

रिलायन्स जिओचा ५२,००० कोटींचा 'महा-आयपीओ'! मुकेश अंबानी आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडणार?

Jio IPO : आरआयएल त्यांचा टेलिकॉम व्यवसाय जिओ इन्फोकॉम शेअर बाजारात सूचीबद्ध करण्याची तयारी करत आहे. हा आयपीओ ५२,२०० कोटी रुपये (सुमारे ६ अब्ज डॉलर्स) किमतीचा असू शकतो.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2025 16:17 IST2025-07-30T16:03:22+5:302025-07-30T16:17:12+5:30

Jio IPO : आरआयएल त्यांचा टेलिकॉम व्यवसाय जिओ इन्फोकॉम शेअर बाजारात सूचीबद्ध करण्याची तयारी करत आहे. हा आयपीओ ५२,२०० कोटी रुपये (सुमारे ६ अब्ज डॉलर्स) किमतीचा असू शकतो.

Reliance Jio IPO Mukesh Ambani Plans India's Largest Public Offering at $6 Billion | रिलायन्स जिओचा ५२,००० कोटींचा 'महा-आयपीओ'! मुकेश अंबानी आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडणार?

रिलायन्स जिओचा ५२,००० कोटींचा 'महा-आयपीओ'! मुकेश अंबानी आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडणार?

Jio IPO News : देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड आतापर्यंतचा भारतातील सर्वात मोठा आयपीओ आणण्याची तयारी करत आहे! रिलायन्स त्यांचा टेलिकॉम व्यवसाय जिओ इन्फोकॉम शेअर बाजारात सूचीबद्ध (लिस्टेड) करण्याची योजना आखत आहे. या आयपीओची किंमत तब्बल ५२,२०० कोटी रुपये (सुमारे ६ अब्ज डॉलर्स) असू शकते. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, रिलायन्सने जिओमधील फक्त ५% हिस्सा विकण्याची परवानगी मिळवण्यासाठी सेबीशी अनौपचारिक चर्चा सुरू केली आहे. जर हा आयपीओ मंजूर झाला, तर तो ह्युंदाई मोटर इंडियाच्या २८,००० कोटी रुपयांच्या आयपीओचा विक्रम मोडेल.

सेबीकडून विशेष मंजुरीची मागणी
खरं तर, सेबीच्या सध्याच्या नियमांनुसार, कंपन्यांना सार्वजनिक विक्रीसाठी (पब्लिक फ्लोट) किमान २५% हिस्सा विकावा लागतो. पण रिलायन्सने सेबीला सांगितले आहे की, भारतीय बाजारपेठेत एवढी मोठी ऑफर सहन करण्याची क्षमता नाही. त्यामुळे, कंपनी फक्त ५% हिस्सा विकण्यासाठी सवलतीची मागणी करत आहे.

पुढील वर्षी आयपीओ लाँच होण्याची शक्यता!
ब्लूमबर्ग सूत्रांनुसार, जिओचा हा मेगा आयपीओ पुढील वर्षाच्या सुरुवातीच्या महिन्यांत लाँच केला जाऊ शकतो. मात्र, त्याचा आकार आणि वेळ बाजारातील परिस्थितीवर अवलंबून असेल. जर ही योजना यशस्वी झाली, तर हा देशातील आतापर्यंतचा सर्वात मोठा आयपीओ ठरेल.

मूल्यांकन १०० अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त होण्याचा अंदाज
जिओचा आयपीओ हा मेटा प्लॅटफॉर्म आणि अल्फाबेट इंक. (Google ची मूळ कंपनी) सारख्या मोठ्या परदेशी गुंतवणूकदारांना जिओमध्ये असलेला त्यांचा काही हिस्सा विकण्याची संधी देईल. २०२० मध्ये, या दोन्ही कंपन्यांनी जिओ प्लॅटफॉर्ममध्ये २० अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त गुंतवणूक केली होती, तेव्हा जिओचे मूल्यांकन ५८ अब्ज डॉलर्स होते. याशिवाय, केकेआर, जनरल अटलांटिक आणि अबू धाबी इन्व्हेस्टमेंट अथॉरिटी सारख्या गुंतवणूकदारांनीही जिओमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे.

वाचा - जुलैमध्ये सोने २,५०० रुपयांनी महागले; आता थेट १ लाख पार करणार? तुमच्या गुंतवणुकीचं काय होणार, वाचा!

बाजारातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, जिओचे मूल्यांकन १०० अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त असू शकते. रिलायन्स आयपीओपूर्वी आपले उत्पन्न आणि ग्राहक संख्या आणखी वाढवू इच्छिते, जेणेकरून कंपनीचे मूल्यांकन आणखी वाढवता येईल. हा आयपीओ भारतीय शेअर बाजारात एक नवीन इतिहास घडवेल अशी अपेक्षा आहे.

Web Title: Reliance Jio IPO Mukesh Ambani Plans India's Largest Public Offering at $6 Billion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.