Pakistan Stock Market : सध्या पाकिस्तानच्याशेअर बाजारात मोठी तेजी दिसून येत आहे. गेल्या एका वर्षात पाकिस्तानचा बेंचमार्क कराची स्टॉक एक्सचेंज तब्बल ६५ टक्क्यांहून अधिक वाढला आहे, जी भारताच्या बाजारातील वाढीपेक्षा जास्त आहे. मात्र, जेव्हा बाजारात सूचीबद्ध असलेल्या दोन्ही देशांतील सर्वात मोठ्या कंपन्यांच्या बाजार भांडवलाची तुलना केली जाते, तेव्हा दोन्ही देशांमधील प्रचंड आर्थिक दरी स्पष्ट होते.
पाकिस्तानमधील सर्वात मोठी कंपनी?
पाकिस्तानमधील सर्वात मौल्यवान कंपनीचे नाव ऑईल ॲण्ड गॅस डेव्हलपमेंट कंपनी लिमिटेड आहे, जी एक सरकारी कंपनी आहे. तर भारताची सर्वात मौल्यवान कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड आहे, जी खासगी मालकीची आहे. ऑईल ॲण्ड गॅस डेव्हलपमेंट कंपनीचे बाजार भांडवल सध्या सुमारे ३.३४ अब्ज डॉलर्स आहे. याउलट, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे बाजार भांडवल सुमारे २३६ अब्ज डॉलर्स आहे. या आकडेवारीनुसार, मुकेश अंबानींची रिलायन्स इंडस्ट्रीज ही पाकिस्तानमधील सर्वात मौल्यवान कंपनी असलेल्या OGDC च्या तुलनेत तब्बल ७० पट मोठी आहे.
वाचा - 'नो-कॉस्ट EMI' चे सत्य काय? कंपन्या आणि बँका प्रोसेसिंग फीसच्या नावाखाली वसूल करतात 'इतके' शुल्क!
एकटी रिलायन्स संपूर्ण पाकिस्तानवर भारी
बाजार भांडवलाच्या दृष्टीने रिलायन्स इंडस्ट्रीज एकटी संपूर्ण पाकिस्तानच्या शेअर बाजारावर वर्चस्व गाजवते. कराची स्टॉक एक्सचेंजवर सूचीबद्ध असलेल्या सर्व कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल सुमारे ६५ अब्ज डॉलर्स आहे. याउलट, एकट्या रिलायन्स इंडस्ट्रीजचे बाजार भांडवल सुमारे २३६ अब्ज डॉलर्स आहे. याचा अर्थ असा की, एकटे मुकेश अंबानी पाकिस्तानच्या शेअर बाजारात सूचीबद्ध असलेल्या सर्व कंपन्यांना सहजपणे विकत घेऊ शकतात! हा फरक दोन्ही देशांच्या अर्थव्यवस्थेतील आणि कंपन्यांच्या क्षमतेतील मोठी तफावत स्पष्ट करतो.
