Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money >शेअर बाजार > शेअर असावा तर असा! ५ वर्षांत ४०००% पेक्षा अधिक रिटर्न; आता 'या' वृत्तामुळे स्टॉक बनला रॉकेट

शेअर असावा तर असा! ५ वर्षांत ४०००% पेक्षा अधिक रिटर्न; आता 'या' वृत्तामुळे स्टॉक बनला रॉकेट

RDB Infra Multibagger Stock: पाहा कोणती आहे ही कंपनी आणि किती आहे या शेअरची किंमत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2026 14:53 IST2026-02-04T14:53:12+5:302026-02-04T14:53:12+5:30

RDB Infra Multibagger Stock: पाहा कोणती आहे ही कंपनी आणि किती आहे या शेअरची किंमत.

RDB Infra Multibagger Stock More than 4000 percent return in 5 years Now the stock has become a rocket due to this news listing on NSE | शेअर असावा तर असा! ५ वर्षांत ४०००% पेक्षा अधिक रिटर्न; आता 'या' वृत्तामुळे स्टॉक बनला रॉकेट

शेअर असावा तर असा! ५ वर्षांत ४०००% पेक्षा अधिक रिटर्न; आता 'या' वृत्तामुळे स्टॉक बनला रॉकेट

RDB Infra Multibagger Stock: RDB इन्फ्रास्ट्रक्चर अँड पॉवरच्या शेअर्समध्ये बुधवारी, ४ फेब्रुवारी रोजी इंट्रा-डे व्यवहारात ४ टक्क्यांहून अधिक वाढ झाली. कंपनीच्या बोर्डाने नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर (NSE) थेट लिस्टिंगच्या प्रस्तावाला मंजुरी दिल्यानंतर ही तेजी पाहायला मिळाली. व्यवहारादरम्यान या शेअरनं ६६.९८ रुपयांचा उच्चांक गाठला. मात्र, १६ जानेवारी २०२६ रोजी गाठलेल्या ९१.८९ रुपयांच्या ५२-आठवड्यांच्या उच्चांकापेक्षा हा शेअर अजूनही २७ टक्क्यांनी खाली आहे. सप्टेंबर २०२५ मध्ये या शेअरने ३५ रुपयांचा ५२-आठवड्यांचा नीचांक गाठला होता.

५ वर्षांत ४,००० टक्क्यांहून अधिक परतावा

गेल्या पाच वर्षांच्या कालावधीत या शेअरने ४,००० टक्क्यांहून अधिक मल्टीबॅगर परतावा दिला आहे. गेल्या एका वर्षात या SME शेअरमध्ये २१ टक्क्यांची वाढ झाली असून, गेल्या सहा महिन्यांत तो ४२ टक्क्यांनी वधारला आहे. गेल्या तीन महिन्यांत यात २७ टक्क्यांची वाढ झाली असली तरी, गेल्या एका महिन्यात मात्र २ टक्क्यांची घसरण नोंदवण्यात आली आहे.

पुन्हा कमी होणार का सोन्या-चांदींची किंमत? सरकारनं इम्पोर्ट ड्युटी बाबत घेतला मोठा निर्णय

एनएसईवर लिस्टिंगची योजना

सध्या केवळ मुंबई शेअर बाजारात लिस्ट असलेल्या RDB इन्फ्रास्ट्रक्चर अँड पॉवरनं आता आपल्या इक्विटी शेअर्सची एनएसईवर थेट लिस्टिंग करण्याची घोषणा केली आहे. ३ फेब्रुवारी २०२६ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. ही प्रक्रिया यशस्वी करण्यासाठी कंपनी प्रतिष्ठित व्यावसायिक आणि सल्लागारांची मदत घेणार आहे.

धोरणात्मक विस्ताराचा भाग

कंपनीच्या मते, हे पाऊल त्यांच्या धोरणात्मक विस्ताराच्या पुढच्या टप्प्यातील भाग आहे. भारतीय भांडवली बाजारात आपली उपस्थिती मजबूत करताना भागधारकांचं मूल्य वाढवण्याचे कंपनीचे दीर्घकालीन उद्दिष्ट आहे. या प्रक्रियेमुळे कंपनीची विश्वासार्हता आणि बाजारातील स्थान अधिक भक्कम होईल, असं कंपनीनं एक्सचेंज फायलिंगमध्ये म्हटलंय.

दुहेरी लिस्टिंगचे फायदे

दोन्ही एक्स्चेंजवर उपस्थिती असल्यामुळे ट्रेडिंग लिक्विडिटीमध्ये लक्षणीय सुधारणा होईल आणि गुंतवणूकदारांचा पाया विस्तृत होईल, असा विश्वास कंपनीनं व्यक्त केलाय. एनएसईवर लिस्टिंग झाल्यानंतर देशांतर्गत आणि जागतिक संस्थागत गुंतवणूकदारांमध्ये कंपनीची ओळख वाढण्याची अपेक्षा आहे. यामुळे शेअर्सच्या अचूक प्राईज डिस्कव्हरीमध्ये सुधारणा होईल आणि भविष्यातील विकास प्रकल्प, धोरणात्मक गुंतवणूक आणि नवनवीन उपक्रमांसाठी भांडवल उभारणं सोपं होईल.

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या किंमतीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title : आरडीबी इंफ्रा शेयर में 4000% रिटर्न के बाद उछाल; एनएसई लिस्टिंग की योजना

Web Summary : आरडीबी इंफ्रा के शेयरों में एनएसई लिस्टिंग की योजना की घोषणा के बाद उछाल आया, पांच वर्षों में 4000% रिटर्न मिला। इस कदम का उद्देश्य ट्रेडिंग लिक्विडिटी को बढ़ाना और निवेशकों तक पहुंच को व्यापक बनाना है, जिससे भविष्य में विकास और रणनीतिक निवेश को बढ़ावा मिलेगा। कंपनी के बोर्ड ने 3 फरवरी, 2026 को एनएसई लिस्टिंग को मंजूरी दी।

Web Title : RDB Infra Share Skyrockets After 4000% Return; NSE Listing Planned

Web Summary : RDB Infra shares surged after announcing NSE listing plans, following a 4000% return in five years. The move aims to enhance trading liquidity and broaden investor reach, facilitating future growth and strategic investments. The company's board approved the NSE listing on February 3, 2026.