Lokmat Money >शेअर बाजार > रॉकेट बनला 'हा' शेअर, रणबीर कपूर-दामानींसह अनेक दिग्गजांची खरेदी

रॉकेट बनला 'हा' शेअर, रणबीर कपूर-दामानींसह अनेक दिग्गजांची खरेदी

Prime Focus Limited Stock: शुक्रवारी कंपनीच्या शेअर्समध्येही १० टक्क्यांनी वाढ दिसून आली. यानंतर आजही कंपनीच्या शेअरमध्ये मोठी तेजी दिसून आली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2025 16:56 IST2025-09-08T16:55:56+5:302025-09-08T16:56:12+5:30

Prime Focus Limited Stock: शुक्रवारी कंपनीच्या शेअर्समध्येही १० टक्क्यांनी वाढ दिसून आली. यानंतर आजही कंपनीच्या शेअरमध्ये मोठी तेजी दिसून आली.

Prime Focus Limited Stock 10 percent high bought by many celebrities investors including Ranbir Kapoor ramesh Damani | रॉकेट बनला 'हा' शेअर, रणबीर कपूर-दामानींसह अनेक दिग्गजांची खरेदी

रॉकेट बनला 'हा' शेअर, रणबीर कपूर-दामानींसह अनेक दिग्गजांची खरेदी

Prime Focus Limited Stock: स्मॉलकॅप स्टॉक प्राइम फोकस लिमिटेडमध्ये सलग दुसऱ्या दिवशी तुफान वाढ दिसून येत आहे. सोमवारी प्राईम फोकसचे शेअर्स १० टक्क्यांनी वाढून १७३.९० रुपयांवर पोहोचले. शुक्रवारी कंपनीच्या शेअर्समध्येही १० टक्क्यांनी वाढ दिसून आली. प्राइम फोकस ही मीडिया आणि मनोरंजन उद्योगाशी संबंधित कंपनी आहे. आगामी रामायण चित्रपटासाठी ही कंपनी प्राथमिक प्रोडक्शन हाऊसेसपैकी एक आहे. बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूरचीही या कंपनीत गुंतवणूक आहे. याशिवाय, अनुभवी गुंतवणूकदार रमेश दमानी, उत्पल सेठ आणि मधु केला यांच्या फंडनंही शुक्रवारी ब्लॉक डीलद्वारे प्राइम फोकसचे शेअर्स खरेदी केलेत.

दमानींनी ८ लाख शेअर्स केले खरेदी

स्टॉक एक्सचेंजमधील आकडेवारीनुसार, अनुभवी गुंतवणूकदार रमेश दमानी यांनी प्राईम फोकस लिमिटेडचे ​​८ लाख शेअर्स खरेदी केले आहेत. दमानी यांनी हे शेअर्स १४२.५५ रुपयांना खरेदी केलेत. त्याच वेळी, उत्पल सेठ यांनी प्राईम फोकस लिमिटेडचे ​​१७.५ लाख शेअर्स त्याच किमतीला खरेदी केलेत. याशिवाय, मधुसूदन केला यांच्या मालकीच्या फंड असलेल्या सिंग्युलॅरिटी लार्ज व्हॅल्यू फंड I ने ब्लॉक डीलमध्ये ६२.५ लाख शेअर्स खरेदी केलेत.

शेअर बाजारात प्रॉफिट-लॉस हे टॅरिफ, महागाई ठरवणार

ऑगस्टा इन्व्हेस्टमेंट्स आय प्रा. लि. नं ५४.४ लाख शेअर्स, मरीना आयव्ही (सिंगापूर) प्रा. लि. आणि मरीना आयव्ही एलपी यांनी अनुक्रमे ३८.९ लाख आणि ९.१५ लाख शेअर्स विकले. सम्यक एंटरप्रायझेस आणि एफई सिक्युरिटीजनेही ब्लॉक डीलमध्ये शेअर्स खरेदी केलेत, दोघांनीही ७ लाखांहून अधिक शेअर्स खरेदी केलेत. रमेश दमानी, उत्पल सेठ किंवा मधुसूदन केला यांच्या फंडांचा पूर्वी प्राईम फोकसमध्ये हिस्सा नव्हता.

रणबीर कपूरचीही मोठी गुंतवणूक

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरने शेअर्सच्या प्रेफरन्शिअल इश्यूद्वारे प्राईम फोकसमध्ये १५-२० कोटी रुपये गुंतवल्याचं वृत्त आहे. प्राईम फोकस लिमिटेडनं यापूर्वी ४६ कोटींहून अधिक शेअर्सच्या इश्यूला मान्यता दिली होती. प्रस्तावित अलॉटिजमध्ये रणबीर कपूरचा समावेश होता, तो सुमारे १२.५ लाख शेअर्स खरेदी करणार होता. प्रमोटर्सकडे प्राईम फोकस लिमिटेडमध्ये ६७.६१ टक्के हिस्सा आहे. त्याच वेळी, कंपनीमध्ये सार्वजनिक हिस्सा ३२.३९ टक्के आहे. प्राइम फोकसची सुरुवात १९९७ मध्ये नमित मल्होत्रा ​​यांनी केली होती, ही कंपनी व्हिज्युअल इफेक्ट्स आणि पोस्ट-प्रॉडक्शनमध्ये जागतिक स्तरावर आघाडीवर आहे.

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: Prime Focus Limited Stock 10 percent high bought by many celebrities investors including Ranbir Kapoor ramesh Damani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.