Investment Schemes News: भारतीय पोस्ट म्हणजेच पोस्ट ऑफिस द्वारे अशीच एक बचत योजना चालवली जात आहे, ज्यामध्ये लोक गुंतवणूक करू शकतात आणि लाखो रुपयांचा नफा कमवू शकतात. पोस्ट ऑफिसच्या सर्व योजना सरकारी योजना आहेत आणि या योजनांमध्ये पैसे बुडण्याची भीती नाही. आज आम्ही तुम्हाला पोस्ट ऑफिसच्या अशा योजनेबद्दल सांगणार आहोत, ज्यामध्ये एकदा गुंतवणूक करून तुम्ही दरवर्षी २ लाख रुपयांपेक्षा जास्त पैसे सहज कमवू शकता. आपण पोस्ट ऑफिसच्या ज्येष्ठ नागरिक बचत योजनेबद्दल म्हणजेच SCSS बद्दल बोलत आहोत. याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करुया.
ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS)
पोस्ट ऑफिस सीनियर सिटीझन सेव्हिंग्ज स्कीम ही फक्त ज्येष्ठ नागरिकांसाठी तयार केलेली आहे परंतु जर तुम्ही ज्येष्ठ नागरिक नसाल तर तुम्ही तुमच्या पालकांच्या नावानं या योजनेत गुंतवणूक करू शकता. या योजनेत तुम्हाला एकत्र गुंतवणूक करावी लागेल. योजनेचा मॅच्युरिटी कालावधी ५ वर्षे आहे. या ५ वर्षात तुम्ही व्याजातून मोठी कमाई करू शकता.
सातव्या वेतन आयोगांतर्गत पगारात लवकरच होणार अखेरची वाढ; कसा होणार १ कोटी कर्मचाऱ्यांना फायदा?
योजना का खास आहे?
ज्येष्ठ नागरिक बचत योजनेची खास गोष्ट म्हणजे त्याचे व्याजदर. या योजनेत, तुम्हाला ८.२ टक्के दरानं वार्षिक व्याज मिळतं, जे तुम्ही दर ३ महिन्यांनी खात्यातून काढू शकता. या योजनेत तुम्ही फक्त १००० रुपयांपासून तुमची गुंतवणूक सुरू करू शकता. तुम्ही जास्तीत जास्त ३० लाख रुपये गुंतवणूक करू शकता.
योजनेतून २ लाख रुपयांची कामाई
जर तुम्ही ज्येष्ठ नागरिक बचत योजनेत एकाच वेळी ३० लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला वार्षिक ८.२ टक्के दरानं व्याज मिळेल. अशा प्रकारे तुम्हाला दरमहा २०,०५० रुपये मिळतील. ही रक्कम तिमाही आधारावर ६०,१५० रुपये असेल. वार्षिक आधारावर, ही रक्कम २.४० लाख रुपये असेल. अशा प्रकारे, तुम्हाला दरवर्षी २.४० लाख रुपये मिळतील, जे ५ वर्षांत एकूण १२.०३ लाख रुपये होतील.