Page Industries Share: पेज इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये मंगळवारी तेजी दिसून आली आणि कंपनीचे शेअर्स इंट्राडे उच्चांकी पातळीवर ४६५४७.५० रुपयांवर पोहोचले. बाजार तज्ज्ञांच्या मते, पेज इंडस्ट्रीजचा शेअर येत्या काही दिवसांत आणखी वाढू शकतो. मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेसने पेज इंडस्ट्रीजवर 'बाय' रेटिंग दिलं असून त्याचं टार्गेट प्राइस ५७ हजार ५०० रुपये आहे. पेज इंडस्ट्रीज लिमिटेड ही वस्त्रोद्योग क्षेत्रातील सक्रिय कंपनी आहे. ही १९९४ साली स्थापन झालेली लार्ज कॅप कंपनी आहे. कंपनीचं मार्केट कॅप ५१,४२९ कोटी रुपये आहे.
काय म्हटलंय ब्रोकरेजनं?
भारतातील वाढत्या इनरवेअर (कपडे उद्योगातील ९ टक्के) आणि अॅथलेझर मार्केटचा फायदा घेण्यासाठी पेज इंडस्ट्रीज सज्ज आहे, असं ब्रोकरेज कंपनीनं एका नोटमध्ये म्हटलंय. जॉकीची मजबूत ब्रँड इक्विटी, कमी किंमतीची उत्पादनं आणि चांगल्या वैविध्यपूर्ण उत्पादन पोर्टफोलिओमुळे मिड-प्रीमियम इनरवेअर सेगमेंटमध्ये कंपनीचं प्रमुख स्थान आहे. कंपनीचे उद्दिष्ट १६ युनिट्सवर मजबूत इन-हाऊस मॅन्युफॅक्चरिंग (८०%) भोवती आहे, जे वार्षिक २८० दशलक्ष युनिट्सचे उत्पादन करते.
कंपनी व्यवसाय
पेज इंडस्ट्रीजच्या प्रमुख उत्पादनं / महसूल विभागांमध्ये ३१ मार्च २०२४ रोजी संपलेल्या वर्षासाठी इनरवेअर आणि लेझरवेअर, स्क्रॅप आणि इतर, इतर ऑपरेटिंग महसूल आणि ड्युटी ड्रॉबॅक यांचा समावेश आहे. कंपनीचा आयपीओ २००७ मध्ये ३९५ रुपयांना आला होता.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. यातील तज्ज्ञांची मतं ही त्यांची वैयक्तिक मतं आहेत. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)