Lokmat Money >शेअर बाजार > या ₹15 पेक्षाही कमी किंमतीच्या शेअरला 5 दिवसांपासून लागतंय अप्पर सर्किट, करतोय मालामाल! पण कारण काय?

या ₹15 पेक्षाही कमी किंमतीच्या शेअरला 5 दिवसांपासून लागतंय अप्पर सर्किट, करतोय मालामाल! पण कारण काय?

गेल्या एका वर्षाचा विचार करता, या ओशिया हाइपर रिटेल लिमिटेडच्या शेअरच्या किंमतीत 51 टक्क्यांची घसरण झाली आहे...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2025 16:22 IST2025-08-22T16:21:35+5:302025-08-22T16:22:35+5:30

गेल्या एका वर्षाचा विचार करता, या ओशिया हाइपर रिटेल लिमिटेडच्या शेअरच्या किंमतीत 51 टक्क्यांची घसरण झाली आहे...

osia hyper retail ltd stock, priced at less than rs 15, has been going through the upper circuit for 5 days after this news came out | या ₹15 पेक्षाही कमी किंमतीच्या शेअरला 5 दिवसांपासून लागतंय अप्पर सर्किट, करतोय मालामाल! पण कारण काय?

या ₹15 पेक्षाही कमी किंमतीच्या शेअरला 5 दिवसांपासून लागतंय अप्पर सर्किट, करतोय मालामाल! पण कारण काय?

स्मॉल कॅप कंपनी ओशिया हायपर रिटेल लिमिटेडच्या (Osia Hyper Retail Ltd) शेअरला आज सलग पाचव्या दिवशी पुन्हा अप्पर सर्किट लागले आहे. एनएसईवर कंपनीचा शेअर 5 टक्क्यांच्या उसळीनंतर, 14.41 रुपयांवर खुला झाला होता. खुला होताच या शेअरला अप्पर सर्किट लागले आहे. यापूर्वी गुरुवारी एनएसईवर हा स्टॉक 13.73 रुपयांवर बंद झाला होता. 

5 दिवसांत 21% ने वधारला -
15 रुपयांपेक्षाही कमी किंमत असलेल्या या स्मॉल कॅप स्टॉकला सातत्याने अप्पर सर्किट लागत आहे. गेल्या 5 व्यवहाराच्या दिवसांत या शेअरच्या किंमतीत 21 टक्क्यांची तेजी आली आहे. कंपनीचा 52 आठवड्यांचा उच्चांक 50.45 रुपये (30 सप्टेंबर 2024) तर 52 आठवड्यांचा नीचांक 11.31 रुपये (14 ऑगस्ट 2025) एवढा आहे. कंपनीचे मार्केट कॅप 237.15 कोटी रुपयांचे आहे.

गेल्या एका वर्षाचा विचार करता, या ओशिया हाइपर रिटेल लिमिटेडच्या शेअरच्या किंमतीत 51 टक्क्यांची घसरण झाली आहे.

यामुळे चर्चेत आहे शेअर - 
कंपनीने एक्सचेंजला दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, 23 ऑगस्टला बोर्डची बैठक प्रस्तावित आहे. बोर्ड 650 कोटी रुपये जमवण्यावर निर्णय घेईल. हा पैसा क्यूआयबी, कंव्हर्टेबल वारंट्स आदि.च्या माध्यमाने जमवला जाऊ शकतो.

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)
 


 

Web Title: osia hyper retail ltd stock, priced at less than rs 15, has been going through the upper circuit for 5 days after this news came out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.