Sebi New Rules: इनव्हेस्टमेंट अॅडव्हायझर आणि रिसर्च अॅनालिस्ट बनू इच्छिणाऱ्यांसाठी शेअर बाजार नियामक सेबीनं आनंदाची बातमी आणली आहे. सेबीनं या प्रोफेशनल्ससाठी शैक्षणिक पात्रता आवश्यकता शिथिल केल्या आहेत. आता, कोणत्याही विषयात पदवीधर असलेले कोणीही यासाठी अर्ज करू शकतात. मंगळवारी जारी केलेल्या दोन वेगवेगळ्या अधिसूचनांमध्ये सेबीनं म्हटलं की बाजारातील समज तपासण्यासाठी NISM प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण होणं अनिवार्य राहील.
सध्याच्या नियमांनुसार, केवळ वित्त, व्यवसाय व्यवस्थापन, वाणिज्य, अर्थशास्त्र किंवा कॅपटल मार्केटमध्ये पदवी (पदवीधर किंवा पदव्युत्तर) असलेलेच नोंदणीसाठी पात्र होते. नवीन नियमांनुसार, तुम्ही अभियांत्रिकी, कायदा किंवा इतर कोणत्याही विषयात पदवी घेतली असेल तरीही गुंतवणूक सल्लागार आणि संशोधन विश्लेषक होण्यासाठी पात्र मानलं जाईल. अर्जदारांकडे कोणत्याही मान्यताप्राप्त भारतीय किंवा परदेशी विद्यापीठातून पदवी असणं आवश्यक आहे.
नोकरी सोडली किंवा काढलं, आता २ दिवसांत होणार फुल अँड फायनल सेटलमेंट! नव्या 'लेबर लॉ'नं बंदलला खेळ
शेअर सर्टिफिकेट हरवलं? काळजी करण्याची गरज नाही
जर तुमचे शेअर्स, बाँड किंवा म्युच्युअल फंड सर्टिफिकेट हरवले असतील तर काळजी करण्याची गरज नाही. सेबीनं नियम शिथिल करण्याचा प्रस्ताव दिला आहे. जर तुमच्या हरवलेल्या शेअर्सची किंमत ₹१० लाखांपर्यंत असेल, तर तुम्हाला डुप्लिकेट प्रत मिळविण्यासाठी पोलीस स्टेशनला जावं लागणार नाही. सेबीच्या प्रस्तावानुसार, पोलीस एफआयआर किंवा वर्तमानपत्रात जाहिरातीशिवाय डुप्लिकेट सर्टिफिकेट मिळविण्यासाठी सूट मर्यादा ₹५ लाखांवरून ₹१० लाखांपर्यंत वाढवली जाईल.
