Navaratna Company Share: नवरत्न दर्जा असलेल्या रेल विकास निगम लिमिटेड (RVNL) च्या शेअर्समध्ये शुक्रवारी जोरदार तेजी पाहायला मिळाली. कंपनीच्या शेअर्सनी BSE वर इंट्राडेमध्ये ६% पेक्षा जास्त वाढ नोंदवत ₹३११.९० पर्यंत झेप घेतली. ही तेजी कंपनीला मिळालेल्या मोठ्या ऑर्डरमुळे आली आहे.
₹९६८ कोटींची रेल्वे ऑर्डर
RVNL ने जाहीर केले की, कंपनी East Coast Railway च्या EPC प्रोजेक्टसाठी लोएस्ट बिडर (L1) ठरली आहे. या प्रकल्पाची किंमत तब्बल ₹९६७.९३ कोटी रुपये असून, हा प्रोजेक्ट ३ वर्षात पूर्ण करायचा आहे. या प्रकल्पांतर्गत भद्रक-विजयनगरम सेक्शन, नेरगुंडी-बारांग आणि खुर्दा रोड-विजयनगरम दरम्यान तिसरी आणि चौथी रेल्वे लाईन विकसित करणे आहे.
शेअर्सचा इतिहास
RVNL चे शेअर्स दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी फायदेशीर ठरले आहेत. या शेअरने ६ वर्षांत १५४०% पेक्षा जास्त परतावा दिला आहे. एप्रिल २०२० मध्ये हा ₹१८.५० वर होता, जो आता एप्रिल २०२६ मध्ये वाढून ₹३११.९० वर आला आहे. आता मोठी ऑर्डर मिळाल्यामुळे कंपनीच्या वाढीची शक्यता आहे.
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
