Multibagger Stock : शेअर बाजारातगुंतवणूकदार नेहमीच अशा शेअर्सच्या शोधात असतात जे रातोरात नशीब बदलून टाकतील, मात्र प्रत्येकाचा हा शोध पूर्ण होत नाही. बाजार तज्ज्ञ नेहमीच 'पेनी स्टॉक्स'मधील (Penny Stocks) गुंतवणूक जोखमीची मानतात, पण हे छोटे शेअर्स अनेकदा अफाट परतावा देतात ही देखील एक वस्तुस्थिती आहे. 'नर्चर वेल इंडस्ट्रीज' (Nurture Well Industries) या पेनी शेअरनं गुंतवणूकदारांना असा परतावा दिला आहे, ज्याची कल्पना सहा वर्षांपूर्वी कोणीही केली नसेल. एकेकाळी अवघ्या ३ पैशांना मिळणाऱ्या या शेअरची किंमत आज ४२.३० रुपयांवर पोहोचली आहे. अवघ्या सहा वर्षांत या शेअरमध्ये १ लाख रुपये गुंतवणारा व्यक्ती आज कोट्याधीश झाली आहे.
चढ-उतारातही शेअरची मजबुती
गेल्या काही महिन्यांत शेअर बाजारात मोठी अस्थिरता असतानाही या 'मल्टीबॅगर' शेअरनं आपली ताकद सिद्ध केली आहे. जानेवारी २०२४ ते ऑगस्ट २०२५ या कालावधीत एकतर्फी तेजी पाहिल्यानंतर या शेअरवर थोडा दबाव आला आणि तो ५७ टक्क्यांनी घसरला. मात्र, सप्टेंबर २०२५ मध्ये या शेअरनं जबरदस्त 'कमबॅक' केलं आणि महिनाभरात ३६ टक्क्यांची रिकव्हरी दाखवली. जानेवारी २०२६ पर्यंत हा शेअर पुन्हा १०२ टक्क्यांनी वधारला, जे या शेअरची पुन्हा सावरण्याची क्षमता दर्शवते. २०२६ मध्ये आतापर्यंत या शेअरमध्ये २२ टक्क्यांची वाढ झाली असून, यात अजूनही मोठी झेप घेण्याची क्षमता असल्याचे संकेत मिळत आहेत.
IT स्टॉक्समध्ये भूकंप! १३ दिवसांत ४.५ लाख कोटींचा फटका, AI तुमची कमाई खाणार का?
१ लाखाचे झाले १४ कोटी रुपये
नर्चर वेल इंडस्ट्रीजनं गेल्या सहा वर्षांत गुंतवणूकदारांना १,४०,५६६% इतका प्रचंड परतावा दिलाय. या काळात शेअरची किंमत ३ पैशांवरून ४२ रुपयांच्या पुढे गेलीये. जर एखाद्या गुंतवणूकदारानं सहा वर्षांपूर्वी या शेअरमध्ये १ लाख रुपये गुंतवले असते आणि आपली गुंतवणूक कायम ठेवली असती, तर आज त्याच्या गुंतवणुकीचे मूल्य १४ कोटी रुपये झालं असते. १९९५ मध्ये स्थापन झालेली ही कंपनी आता केवळ एक छोटी कंपनी राहिलेली नाही. ही एक वैविध्यपूर्ण फूड कंपनी बनली असून, सेंद्रिय खाद्यपदार्थांपासून बेकरी उत्पादनं आणि प्रोसेस्ड फूडपर्यंत ती उत्पादन करते. आज या कंपनीचे बाजार भांडवल १००० कोटी रुपयांच्या जादूई आकड्यावर पोहोचलंय.
तिसऱ्या तिमाहीचे धमाकेदार निकाल
कंपनीच्या शेअरमधील या तेजीमागे केवळ भावना नसून ठोस आर्थिक आकडेवारी आहे. आर्थिक वर्ष २०२६ च्या तिसऱ्या तिमाहीचे निकाल कंपनीची पकड मजबूत असल्याचं सिद्ध करतात. कंपनीचा निव्वळ नफा वार्षिक आधारावर ९५ टक्क्यांनी वाढून ३४.६० कोटी रुपये झालाय. महसूल ४६ टक्क्यांच्या वाढीसह २९० कोटी रुपयांवर पोहोचला असून, EBITDA जवळजवळ दुप्पट होऊन ३३.१९ कोटी रुपये झाला. या यशाचं मोठं श्रेय कंपनीच्या 'प्रोडक्ट मिक्स'ला जाते. बेकरी क्षेत्रात घेतलेल्या धोरणात्मक प्रवेशामुळे कंपनीच्या नफ्याचं प्रमाण पूर्णपणे बदललं असून, वाढत्या मागणीमुळे ही कंपनी एक 'ग्रोथ मशीन' बनली आहे.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
