Multibagger Stock: शेअर बाजारात जर एखाद्या चांगल्या कंपनीत विचारपूर्वक गुंतवणूक केली तर ती कमी वेळात गुंतवणूकदारांना मोठा परतावा देऊ शकते. नेटवर्क पीपल सर्व्हिसेस टेक्नोलॉजीच्या (Network People Services Technologies)शेअर्सच्या बाबतीत असंच काहीसं पाहायला मिळालं आहे. अवघ्या चार वर्षांत या कंपनीनं पोझिशनल गुंतवणूकदारांच्या १ लाख रुपयांचे ६४ लाख रुपये केले आहेत.
जानेवारी २०२२ पासून बदलली परिस्थिती
कंपनीच्या शेअर्समधील तेजी जानेवारी २०२२ पासून सुरू झाली आणि ती ऑगस्ट २०२४ पर्यंत पाहायला मिळाली. यामुळे या काळात कंपनीच्या शेअर्सचा भाव १६,२७० टक्क्यांनी वाढला आहे. नेटवर्क पीपल सर्व्हिसेस टेक्नोलॉजीचा शेअर ३,५७७ रुपयांच्या विक्रमी उच्चांकी स्तरावर पोहोचला आहे.
Tata च्या 'या' कंपनीनं केलं मालामाल; १ लाख रुपयांचे झाले १ कोटींपेक्षा अधिक, कोणता आहे स्टॉक?
डिसेंबर २०२२ हा महिना कंपनीच्या शेअर्सच्या दृष्टीने असा होता जेव्हा किमतीत ९०.४० टक्क्यांची वाढ झाली. यानंतर जुलै २०२४ मध्ये कंपनीच्या शेअर्सचा भाव ६५.३० टक्क्यांनी वाढला होता.
कोणत्या वर्षी किती वाढला शेअर?
गेल्या चार वर्षांत कंपनीच्या शेअर्समध्ये तीन वर्षे मोठी तेजी नोंदवण्यात आली आहे. या दृष्टीनं २०२३ हे वर्ष अत्यंत शानदार राहिलं, तेव्हा नेटवर्क पीपल सर्व्हिसेसच्या शेअर्सच्या किमतीत १,०१२ टक्क्यांची तेजी आली. २०२४ मध्ये २२६ टक्के आणि २०२२ मध्ये २०१ टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे. या काळात कंपनीचा शेअर २१.८५ रुपयांवरून वाढून १,४०० रुपयांची पातळी ओलांडून गेला. विशेष म्हणजे, २०२५ मध्ये कंपनीच्या शेअर्सच्या किमतीत ४७ टक्क्यांची घसरण पाहायला मिळाली, जी लिस्टिंगनंतरची कोणत्याही एका वर्षातील सर्वात मोठी घसरण आहे.
लाभांश बाबत माहिती
गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात हा मल्टीबॅगर स्टॉक एक्स-डिविडेंड (Ex-dividend) ट्रेड झाला होता. तेव्हा कंपनीनं एका शेअरवर पात्र गुंतवणूकदारांना दोन रुपये लाभांश दिला होता. कंपनीकडून लाभांश देण्याची ही पहिली आणि शेवटची वेळ होती.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
