Multibagger Stock: मल्टिबॅगर एफएमसीजी कंपनी एलीटकॉन इंटरनॅशनल लिमिटेडचे शेअर्स बुधवारी एक्स-डिव्हिडंड (Ex-Dividend) म्हणून ट्रेड झाले. कंपनीने चालू आर्थिक वर्षासाठी अंतरिम लाभांश (Interim Dividend) घोषित केला होता. हा लाभांश ₹१ च्या फेस व्हॅल्यूच्या शेअर्सवर दिला जाईल.
कंपनीच्या संचालक मंडळानं ५ नोव्हेंबर २०२५ रोजी झालेल्या बोर्ड मीटिंगमध्ये या निर्णयाला मंजुरी दिली होती. लाभांशासाठी रेकॉर्ड डेट १२ नोव्हेंबर २०२५ निश्चित करण्यात आली आहे, म्हणजेच या तारखेपर्यंत ज्या गुंतवणूकदारांकडे कंपनीचे शेअर्स असतील, ते लाभांश मिळवण्यासाठी पात्र असतील. आजच्या सुरुवातीच्या व्यवहारात शेअर्समध्ये किरकोळ घसरण नोंदवली गेली होती. व्यवहारादरम्यान हा शेअर ₹१४५.७० वर आला होता.
छोट्या गुंतवणूकदारांना केलं कोट्यधीश
एफएमसीजी कंपनी असलेल्या एलीटकॉन इंटरनॅशनल लिमिटेडनं गेल्या एका वर्षात गुंतवणूकदारांना आश्चर्यकारक परतावा दिला आहे. कंपनीच्या शेअर्सनं जवळपास ११,०००% चा जबरदस्त परतावा दिला. या काळात त्याची किंमत ₹१ वरून सध्याच्या किमतीपर्यंत वाढली. म्हणजेच ज्याने एक वर्षापूर्वी ₹१ लाखांची गुंतवणूक केली असती, त्याचे मूल्य आज ₹१.१ कोटींपेक्षा अधिक झालं असतं. या शानदार कामगिरीमुळे एलीटकॉन इंटरनॅशनल लिमिटेडचा समावेश भारतातील सर्वात वेगानं वाढणाऱ्या मल्टिबॅगर कंपन्यांमध्ये झाला आहे.
नफ्यात १२८% ची वाढ
कंपनीने नुकतेच आपले सप्टेंबर तिमाहीचे (Q2 FY26) निकाल जारी केले होते, ज्यात कामगिरी अपेक्षेपेक्षा चांगली राहिली. कंपनीचा स्टैंडअलोन नेट प्रॉफिट ₹२०.१९ कोटी राहिला, जो मागील वर्षाच्या याच तिमाहीतील ₹८.८४ कोटींच्या तुलनेत १२८% ची वाढ दर्शवतो. तिचे ऑपरेटिंग उत्पन्न ₹५०४.८९ कोटी राहिले, जे मागील वर्षाच्या ₹७९.१३ कोटींहून पाच पटीनं अधिक वाढले. कंपनीनुसार, मजबूत वॉल्यूम ग्रोथ आणि नवीन एफएमसीजी सेगमेंटमध्ये विस्तारामुळे तिची आर्थिक स्थिती मजबूत झाली आहे.
BSE मध्ये कंपनीचा स्पष्टीकरण अहवाल
२९ सप्टेंबर २०२५ रोजी BSE मध्ये दाखल केलेल्या एका स्पष्टीकरणामध्ये कंपनीनं म्हटले होतं की, शेअर्समध्ये वेगानं आलेली वॉल्यूम वाढ पूर्णपणे बाजारामुळे होती. कंपनीने स्पष्ट केले की तिच्या कार्याशी किंवा कामगिरीशी संबंधित कोणतीही नवीन किंवा महत्त्वपूर्ण माहिती लपविली गेली नाही आणि सर्व तपशील आधीच सार्वजनिक स्वरूपात दिले गेले आहेत. कंपनीचा पोर्टफोलिओ सिगारेट, स्मोकिंग उत्पादनं आणि संबंधित वस्तूंचे उत्पादन व ट्रेडिंग तसंच एफएमसीजी कॅटेगरीमध्ये विस्तारावर केंद्रित आहे.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
