Lokmat Money >शेअर बाजार > तेल ते टेलिकॉमपर्यंत... उद्योगपती मुकेश अंबानींचं साम्राज्य किती मोठं? इतक्या कंपनीचे आहेत मालक

तेल ते टेलिकॉमपर्यंत... उद्योगपती मुकेश अंबानींचं साम्राज्य किती मोठं? इतक्या कंपनीचे आहेत मालक

Mukesh Ambani : उद्योगपती मुकेश अंबानी हे केवळ रिलायन्स इंडस्ट्रीजचेच नाही तर इतर अनेक कंपन्यांचे मालक आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2025 12:43 IST2025-07-20T12:41:52+5:302025-07-20T12:43:46+5:30

Mukesh Ambani : उद्योगपती मुकेश अंबानी हे केवळ रिलायन्स इंडस्ट्रीजचेच नाही तर इतर अनेक कंपन्यांचे मालक आहेत.

Mukesh Ambani's Business Empire List of 15+ Companies Beyond Reliance Industries | तेल ते टेलिकॉमपर्यंत... उद्योगपती मुकेश अंबानींचं साम्राज्य किती मोठं? इतक्या कंपनीचे आहेत मालक

तेल ते टेलिकॉमपर्यंत... उद्योगपती मुकेश अंबानींचं साम्राज्य किती मोठं? इतक्या कंपनीचे आहेत मालक

Mukesh Ambani : रतन टाटा यांच्या टाटा समुहानंतर, आता उद्योगपती मुकेश अंबानी यांचा रिलायन्स उद्योग समूह देखील अनेक क्षेत्रांमध्ये आपला दबदबा निर्माण करत आहे. देशातील सर्वात श्रीमंत आणि यशस्वी उद्योजकांपैकी एक असलेल्या मुकेश अंबानी यांच्याकडे केवळ रिलायन्स इंडस्ट्रीजच नाही, तर १५ हून अधिक कंपन्या आहेत, ज्यांचे बाजारमूल्य कोट्यवधी रुपयांमध्ये आहे.

मुकेश अंबानी यांचा व्यवसाय आता फक्त तेल आणि वायू क्षेत्रापुरता मर्यादित राहिलेला नाही. त्यांनी आपल्या वडिलांकडून मिळालेला व्यवसाय आपल्या कठोर परिश्रम आणि दूरदृष्टीने रिटेलपासून ते टेलिकॉमपर्यंत आणि आता अगदी FMCG (फास्ट मूव्हिंग कंझ्युमर गुड्स) पर्यंत विस्तारला आहे.

मुकेश अंबानींच्या कंपन्यांची लांबलचक यादी

  • मुकेश अंबानी यांची सर्वात मोठी आणि प्रसिद्ध कंपनी अर्थातच रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड आहे.
  • टेलिकॉम आणि डिजिटल : रिलायन्स जिओ, जिओ मार्ट, जिओ हॉटस्टार, जिओ सावन.
  • मीडिया आणि मनोरंजन : नेटवर्क १८, व्हायाकॉम १८.
  • रिटेल आणि ई-कॉमर्स : रिलायन्स रिटेल, हॅम्लीज, जस्ट डायल, अजियो, रिलायन्स ट्रेंड्स, रिलायन्स डिजिटल, रिलायन्स फ्रेश, स्मार्ट बाजार, नेटमेड्स, अर्बन लॅडर, टिरा ब्युटी, इंडिपेंडन्स.
  • इतर व्यवसाय : जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस, जिओ-बीपी, कॅम्पा कोला, आलोक इंडस्ट्रीज, डेन नेटवर्क, आणि हॅथवे केबल अँड डेटाकॉम.
  • सामाजिक उपक्रम : रिलायन्स फाउंडेशन.

कंपन्यांची जबरदस्त कामगिरी
अंबानी यांच्या कंपन्यांनी अलिकडेच उत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्यांची मुख्य कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजने २०२५-२६ या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीचे (एप्रिल-जून) निकाल जाहीर केले आहेत, जे खूपच प्रभावी आहेत.
रिलायन्स इंडस्ट्रीजचा निव्वळ नफा : कंपनीचा एकत्रित निव्वळ नफा वर्षानुवर्षे ७८ टक्क्यांनी वाढून २६,९९४ कोटी रुपये झाला आहे! गेल्या वर्षी याच तिमाहीत हा नफा केवळ १५,१३८ कोटी रुपये होता.

वाचा - 'स्लीपिंग प्रिन्स'ची २० वर्षांची लढाई संपली! वडिलांनी लाईफ सपोर्ट काढण्यास दिला होता नकार!


रिलायन्स रिटेलचा नफा : आरआयएलची रिटेल शाखा असलेल्या रिलायन्स रिटेलचा निव्वळ नफा वर्षानुवर्षे २८.३ टक्क्यांनी वाढून ३,२७१ कोटी रुपये झाला आहे. (मागील तिमाहीतील ३,५४५ कोटींच्या तुलनेत हा थोडा कमी असला तरी, वर्षागणिक वाढ प्रभावी आहे.)

Web Title: Mukesh Ambani's Business Empire List of 15+ Companies Beyond Reliance Industries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.