Lokmat Money >शेअर बाजार > अनिल अंबानींनंतर आता मुकेश अंबानींचे वाईट दिवस? ५ दिवसांत मोठी उलथापालथ

अनिल अंबानींनंतर आता मुकेश अंबानींचे वाईट दिवस? ५ दिवसांत मोठी उलथापालथ

Mukesh Ambani : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजसाठी वाईट दिवस सुरू आहेत. कारण, गेल्या ५ दिवसात कंपनीचे तब्बल ७५ हजार कोटींचे नुकसान झाले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2025 12:36 IST2025-01-26T12:34:54+5:302025-01-26T12:36:29+5:30

Mukesh Ambani : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजसाठी वाईट दिवस सुरू आहेत. कारण, गेल्या ५ दिवसात कंपनीचे तब्बल ७५ हजार कोटींचे नुकसान झाले.

mukesh ambani reliance industries lost rs 75 thousand crore in 5 days | अनिल अंबानींनंतर आता मुकेश अंबानींचे वाईट दिवस? ५ दिवसांत मोठी उलथापालथ

अनिल अंबानींनंतर आता मुकेश अंबानींचे वाईट दिवस? ५ दिवसांत मोठी उलथापालथ

Mukesh Ambani : काही वर्षांपूर्वी व्यवसायतलं ग्लॅमरस नाव अनिल अंबानी यांना उतरती कळा लागली होती. एकदा तर अटकेची टांगती तलवार होती. मात्र, शेवटी मोठा भाऊ मुकेश अंबानी धावून आले आणि संकट टळलं. मुकेश अंबानी आता संपलेच असच सर्वांना वाटलं. मात्र, त्यांनी राखेतून फिनिक्स पक्षी जसा झेप घेतो, तशीच उभारी घेतली. अनिल अंबानी यांनी अनेक कंपन्यांचं कर्ज फेडलं. सेबीनेही त्यांना शेअर बाजारात येण्यास परवानगी दिली. मात्र, काहीच दिवसात पुन्हा त्यांच्या कंपनीच्या शेअर्समध्ये घसरण झाली. आता अशीच अवस्था मोठे बंधू मुकेश अंबानी यांची झाली आहे. रिलायन्स समुहातील कंपनीच्या शेअर्समध्ये झालेल्या घसरणीमुळे अंबानी यांना तब्बल ७५ हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले.

५ दिवसांत अंबानींचे ७५ हजार कोटी पाण्यात
गेल्या आठवड्यात शेअर मार्केटमध्ये मोठी उलथापालथ पाहायला मिळाली. दिग्गज कंपन्यांचे शेअर्स वेगाने कोसळले. यात रिलायन्स इंडस्ट्री अपवाद ठरला नाही. या घसरणीमुळे रिलायन्स कंपनीचे मार्केट कॅप ७५ हजार कोटी रुपयांनी कमी झाले आहे. यामध्ये फक्त रिलायन्सच नाही तर विमा क्षेत्रातील दिग्गज कंपनी एलआयसी आणि एसबीआयच्या मार्केट कॅपमध्येही मोठी घसरण दिसून आली. देशातील दुसऱ्या क्रमांकाची कर्जदार ICICI बँकेच्या मार्केट कॅपमध्येही घसरण झाली आहे. गेल्या आठवड्यात देशातील १० सर्वात मौल्यवान कंपन्यांपैकी चार कंपन्यांचे एकत्रित बाजार भांडवल १,२५,३९७.४५ कोटी रुपयांनी घसरले.

कोणत्या कंपन्यांमध्ये किती घसरण झाली. 
देशातील सर्वात मोठी कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजचे बाजारमूल्य ७४,९६९.३५ कोटी रुपयांनी घसरून १६,८५,९९८.३४ कोटी रुपयांवर आले. तर विमा क्षेत्रातील मोठा खेळाडू भारतीय आयुर्विमा महामंडळचे बाजार भांडवल ५,१९,४७२.०६ कोटी रुपये झाले. यामध्ये २१,२५१.९९ कोटी रुपयांती घसरण झाली. तब्बल १७,६२६.१३ कोटी रुपयांचे मूल्यांकन घसरल्याने देशातील सर्वात मोठी सरकारी कर्ज देणारी स्टेट बँक ऑफ इंडियाचे मूल्य आता ६,६४,३०४.०९ कोटी रुपयांवर आले आहे. देशातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी खाजगी कर्ज देणारी ICICI बँकेचे मूल्यांकन ११,५४९.९८ कोटी रुपयांनी घसरून ८,५३,९४५.१९ कोटी रुपयांवर आले आहे.

या कंपन्यांचा वाढला नफा
दुसरीकडे, देशातील टॉप १० कंपन्यांपैकी ६ कंपन्यांचे मार्केट कॅप वाढले आहे. या कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये एकत्रितपणे ५८,५५४.८८ कोटी रुपयांची वाढ झाली आहे. सर्वाधिक भरीव कामगिरी आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी इन्फोसिसने केली. टीसीएस, एचडीएफसी बँक, एअरटेल, आयटी आणि एचयूएलच्या बाजार भांडवलात चांगली वाढ झाली.

Web Title: mukesh ambani reliance industries lost rs 75 thousand crore in 5 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.