Lokmat Money >शेअर बाजार > प्रत्येक शेअरवर ५०,००० रुपयांचा फायदा; ना बोनस, ना स्टॉक स्प्लिट तरीही गुंतवणूकदार झाले मालामाल

प्रत्येक शेअरवर ५०,००० रुपयांचा फायदा; ना बोनस, ना स्टॉक स्प्लिट तरीही गुंतवणूकदार झाले मालामाल

MRF share price: किरकोळ गुंतवणूकदार अनेकदा लार्ज-कॅप शेअर्सपासून दूर राहतात. विशेषतः ते जास्त किमतीच्या स्टॉकपेक्षा स्मॉल-कॅप स्टॉक पसंत करतात.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2025 16:51 IST2025-07-17T16:50:30+5:302025-07-17T16:51:49+5:30

MRF share price: किरकोळ गुंतवणूकदार अनेकदा लार्ज-कॅप शेअर्सपासून दूर राहतात. विशेषतः ते जास्त किमतीच्या स्टॉकपेक्षा स्मॉल-कॅप स्टॉक पसंत करतात.

mrf stock price Profit of Rs 50000 on each share No bonus no stock split yet investors became rich | प्रत्येक शेअरवर ५०,००० रुपयांचा फायदा; ना बोनस, ना स्टॉक स्प्लिट तरीही गुंतवणूकदार झाले मालामाल

प्रत्येक शेअरवर ५०,००० रुपयांचा फायदा; ना बोनस, ना स्टॉक स्प्लिट तरीही गुंतवणूकदार झाले मालामाल

MRF share price: किरकोळ गुंतवणूकदार अनेकदा लार्ज-कॅप शेअर्सपासून दूर राहतात. विशेषतः ते जास्त किमतीच्या स्टॉकपेक्षा स्मॉल-कॅप स्टॉक पसंत करतात. कदाचित यामागचं कारण ते अधिक परवडणारे दिसतात आणि जलद नफाही मिळण्याची शक्यता असते. दरम्यान, भारतातील सर्वात महागड्या स्टॉकपैकी एक असूनही, एमआरएफनं तुफान कामगिरी केली आहे. तसंच उच्च किंमत म्हणजे कमी परतावा नाही हेही सिद्ध केलंय.

शेअर्सची स्थिती

मार्चच्या सुरुवातीला कंपनीचे शेअर्स प्रति शेअर ₹ १०२,१२४ वर व्यवहार करत होते आणि फक्त चार महिन्यांत ते ₹ ५०,०५१ म्हणजेच ४९.३% नं वधारले आणि अलीकडेच ₹ १५२,१७५ वर बंद झाले. हा शेअर दर महिन्यात वाढीसह बंद झाला आहे आणि चालू महिन्यातही वाढीसह बंद होण्याच्या मार्गावर आहे. जर ही गती कायम राहिली तर, या शेअरमध्ये आजपर्यंत ७% वाढ झाली आहे. गेल्या काही महिन्यांत भारतीय शेअर बाजार चढ-उताराच्या स्थितीत असूनही, या शेअरनं आपली कामगिरी कायम ठेवलीये.

दहाव्यांदा बोनस शेअर देणार 'ही' मल्टीबॅगर कंपनी; १८ जुलै आहे रेकॉर्ड डेट, तुमच्याकडे आहे का?

जून २०२३ मध्ये १ लाखांचा टप्पा पार

जून २०२३ मध्ये १ लाख रुपयांचा टप्पा ओलांडल्यानंतर आणि ही कामगिरी करणारी पहिली कंपनी बनल्यानंतर, या शेअरनं सातत्यानं या पातळीच्या वर व्यवहार केला आहे. मागील ट्रेडिंग सत्रात, त्यानं ₹१५३,००० चा नवीन सार्वकालिक उच्चांक देखील गाठला होता. १९९६ पासून लिस्ट असूनही, या शेअरवर कधीही बोनस इश्यू किंवा स्टॉक स्प्लिट झालेलं नाही. या स्टॉकची सरासरी दैनिक उलाढाल ५,००० ते १०,००० शेअर्स दरम्यान आहे, ज्यामध्ये बीएसई आणि एनएसई दोन्हीवरील व्यवहारांचा समावेश आहे.

२०१४ हे वर्ष ९६% च्या मोठ्या वाढीसह सर्वोत्तम वर्ष राहिलं आहे, तर २०१७ मध्ये ४८% ची वाढ नोंदवली गेली. या संपूर्ण कालावधीत, शेअरनं ७,४९७% ची प्रभावी वाढ नोंदवली आहे, जी ₹२,००३ वरून सध्याच्या ₹१५२,१७५ प्रति शेअर पातळीवर पोहोचली आहे.

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: mrf stock price Profit of Rs 50000 on each share No bonus no stock split yet investors became rich

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.