LG Electronics IPO Allotment Today: एलजी इलेक्ट्रॉनिक्सनं भारताच्या आयपीओ बाजारात इतिहास रचला आहे. हा पहिला आयपीओ आहे, ज्याचं एकूण सबस्क्रिप्शन मूल्य ४ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त झालं आहे. संस्थात्मक आणि किरकोळ गुंतवणूकदारांमध्ये जबरदस्त उत्साह दिसून आला.
बीएसईच्या (BSE) डेटानुसार, आयपीओसाठी ३८५ कोटींपेक्षा जास्त शेअर्सवर बोली लागली, तर ऑफरमध्ये फक्त ७.१३ कोटी शेअर्स होते. यामुळे एकूण बिड्सचं मूल्य सुमारे ४.४ लाख कोटी रुपये झालं आहे. मूल्याच्या दृष्टीने हा भारतातील सर्वाधिक सबस्क्राईब झालेला आयपीओ आहे. आता गुंतवणूकदारांचं लक्ष एलजी इलेक्ट्रॉनिक्सच्या आयपीओ अलॉटमेंटवर आहे, जे आज, १० ऑक्टोबर २०२५ रोजी होण्याची अपेक्षा आहे.
बजाज हाउसिंग फायनान्सचा विक्रम मोडला
क्वालिफाइड इन्स्टिट्यूशनल बायर्ससाठी (QIBs) राखीव कोटा २,०३,२१,०२६ शेअर्सचा होता, परंतु त्यांनी ३,३८,३६,२१,७४८ शेअर्सवर बोली लावली, म्हणजेच १६६ पट जास्त. यापूर्वी हा विक्रम बजाज हाउसिंग फायनान्सच्या नावावर होता. सप्टेंबर २०२४ मध्ये त्यांच्या ६,५६० कोटी रुपयांच्या आयपीओवर एकूण ३.२४ लाख कोटी रुपयांची बोली लागली होती. त्यापूर्वी, २०१० मध्ये कोल इंडियाच्या आयपीओवर २.३६ लाख कोटी रुपयांची बोली लागली होती.
नोव्हेंबर २०२३ मध्ये टाटा टेक्नॉलॉजीजच्या आयपीओवर १.५६ लाख कोटी आणि २०२४ मध्ये प्रीमियर एनर्जीजच्या आयपीओवर १.४८ लाख कोटी रुपयांची बोली लागली होती. पण एलजी इलेक्ट्रॉनिक्स इंडिया लिमिटेडने या सर्वांना मागे टाकलं आहे.
आज १० ऑक्टोबरला याचे शेअर अलॉटमेंट फायनल होईल. गुंतवणूकदारांचा प्रतिसाद विक्रम मोडणारा होता आणि प्रत्येक कॅटेगरीत ओव्हरसबस्क्रिप्शननं बाजारात खळबळ माजवली. जर तुम्हीही या आयपीओमध्ये अर्ज केला असेल, तर आता अलॉटमेंट स्टेटस तपासण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा:
एनएसई (NSE) वर अलॉटमेंट कशी तपासावी?
एनएसईवर अलॉटमेंट स्टेटस पाहण्यासाठी, सर्वप्रथम एनएसईच्या https://www.nseindia.com/invest/check-trades-bids-verify-ipo-bids या आयपीओ अलॉटमेंट पेजवर जा.
येथे उपलब्ध पर्यायांमधून ‘इक्विटी ॲन्ड एसएमई आयपीओ बिड डिटेल्स’ निवडा.
- त्यानंतर च्या ड्रॉपडाउन लिस्टमधून ‘एलजी ईइंडिया’ निवडा.
- तुमचा पॅन नंबर आणि अप्लिकेशन नंबर टाका. ‘सबमिट’ वर क्लिक करा, म्हणजे तुमचे आयपीओ अलॉटमेंट स्टेटस दिसेल.
बीएसईवर अलॉटमेंट कसं तपासावं?
- बीएसईवर तपासण्यासाठी, बीएसईचे आयपीओ अलॉटमेंट पेज उघडा.
- https://www.bseindia.com/investors/appli_check.aspx या लिंकवर क्लिक करा
- यामध्ये ‘इश्यू टाईप’ मध्ये ‘इक्विटी’ निवडा. ड्रॉपडाउन मेन्यूमधून ‘एलजी इलेक्ट्रॉनिक्स इंडिया लिमिटेड’ निवडा.
- त्यानंतर तुमचा पॅन किंवा अप्लिकेशन नंबर टाका. कॅप्चा व्हेरिफिकेशन (Captcha Verification) पूर्ण करा.
- ‘सर्च’ वर क्लिक करा, म्हणजे स्टेटस समोर येईल.