Lokmat Money >शेअर बाजार > १ लाखांचे झाले ८४ लाख; ११ महिन्यांमध्ये ८३०० टक्क्यांनी वधारला 'हा' छोटा शेअर, तुमच्याकडे आहे का?

१ लाखांचे झाले ८४ लाख; ११ महिन्यांमध्ये ८३०० टक्क्यांनी वधारला 'हा' छोटा शेअर, तुमच्याकडे आहे का?

Kothari Industrial Share Penny Stock: कंपनीच्या शेअर्सनं गुरुवार, १३ मार्च २०२५ रोजी ५२ आठवड्यांचा नवा उच्चांक गाठला. कंपनीच्या शेअर्सचा ५२ आठवड्यांचा नीचांकी स्तर १.८० रुपये आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2025 12:25 IST2025-03-15T12:22:02+5:302025-03-15T12:25:03+5:30

Kothari Industrial Share Penny Stock: कंपनीच्या शेअर्सनं गुरुवार, १३ मार्च २०२५ रोजी ५२ आठवड्यांचा नवा उच्चांक गाठला. कंपनीच्या शेअर्सचा ५२ आठवड्यांचा नीचांकी स्तर १.८० रुपये आहे.

Kothari Industrial stock price 1 lakh became 84 lakh small share increased by 8300 percent in 11 months do you have it | १ लाखांचे झाले ८४ लाख; ११ महिन्यांमध्ये ८३०० टक्क्यांनी वधारला 'हा' छोटा शेअर, तुमच्याकडे आहे का?

१ लाखांचे झाले ८४ लाख; ११ महिन्यांमध्ये ८३०० टक्क्यांनी वधारला 'हा' छोटा शेअर, तुमच्याकडे आहे का?

Kothari Industrial Share Penny Stock: कोठारी इंडस्ट्रियल कॉर्पोरेशन या छोट्या कंपनीनं शेअरहोल्डर्सना जोरदार परतावा दिला आहे. ११ महिन्यांत कंपनीच्या शेअर्समध्ये ८३०० टक्क्यांहून अधिक वाढ झाली. या काळात कोठारी इंडस्ट्रियल कॉर्पोरेशनचा शेअर सुमारे दोन रुपयांवरून १५९ रुपयांवर गेलाय. कंपनीच्या शेअर्सनं गुरुवार, १३ मार्च २०२५ रोजी ५२ आठवड्यांचा नवा उच्चांक गाठला. कंपनीच्या शेअर्सचा ५२ आठवड्यांचा नीचांकी स्तर १.८० रुपये आहे.

१ लाखांचे झाले ८४ लाख

कंपनीचा शेअर २ एप्रिल २०२४ रोजी १.८९ रुपयांवर होता. १३ मार्च २०२५ रोजी कंपनीचा शेअर १५९.२५ रुपयांवर बंद झाला. गेल्या ११ महिन्यांत कोठारी इंडस्ट्रियलच्या शेअरमध्ये ८३२५ टक्क्यांची वाढ झाली आहे. जर एखाद्या व्यक्तीनं २ एप्रिल २०२४ रोजी कोठारी इंडस्ट्रियल कॉर्पोरेशनच्या शेअर्समध्ये १ लाख रुपयांची गुंतवणूक केली असती आणि आपली गुंतवणूक कायम ठेवली असती तर सध्या १ लाख रुपयांना खरेदी केलेल्या शेअर्सची किंमत ८४.२५ लाख रुपये झाली असती.

कोठारी इंडस्ट्रियल कॉर्पोरेशनच्या शेअरमध्ये गेल्या सहा महिन्यांत ६०२ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. १६ सप्टेंबर २०२४ रोजी स्मॉलकॅप कंपनीचा शेअर २२.६८ रुपयांवर होता. १३ मार्च २०२५ रोजी कंपनीचा शेअर १५९.२५ रुपयांवर बंद झाला. गेल्या तीन महिन्यांत कोठारी इंडस्ट्रियल कॉर्पोरेशनच्या शेअरमध्ये सुमारे १२० टक्क्यांची वाढ झाली आहे. या वर्षी आतापर्यंत कंपनीच्या शेअर्समध्ये जवळपास ८८ टक्क्यांची वाढ झाली. तर कोठारी इंडस्ट्रियलचा शेअर गेल्या महिन्याभरात २७ टक्क्यांनी वधारलाय.

कंपनीत एलआयसीही गुंतवणूक

देशातील सर्वात मोठी विमा कंपनी असलेल्या भारतीय आयुर्विमा महामंडळाची (LIC) कोठारी इंडस्ट्रियल कॉर्पोरेशनमध्ये मोठी गुंतवणूक आहे. कोठारी इंडस्ट्रियल कॉर्पोरेशनमध्ये एलआयसीचे १४७१६२९ शेअर्स आहेत. एलआयसीचा कंपनीत १.८९ टक्के हिस्सा आहे. ही शेअरहोल्डिंगची आकडेवारी डिसेंबर २०२४ तिमाहीपर्यंतची आहे.

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: Kothari Industrial stock price 1 lakh became 84 lakh small share increased by 8300 percent in 11 months do you have it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.