Kalyan Jewellers India Ltd: तिमाही निकाल चांगले असूनही, कल्याण ज्वेलर्स इंडिया लिमिटेडच्या शेअर्समध्ये आज मोठी घसरण दिसून आली. शुक्रवारच्या इंट्रा-डे उच्चांकाच्या तुलनेत कंपनीचे शेअर्स १४ टक्क्यांनी घसरले आहेत. दरम्यान, गेल्या ३ ट्रेडिंग दिवसांत या दागिनं बनवणाऱ्या कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे.
आज, बीएसईवर हा शेअर ६१५.६५ रुपयांच्या वाढीसह उघडला. परंतु काही काळानंतर, कंपनीच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात विक्री सुरू झाली. त्यानंतर कंपनीच्या शेअर्सची किंमत ५३४.९५ रुपयांच्या इंट्रा डे नीचांकी पातळीवर घसरली.
३ दिवसांत ६०% पेक्षा जास्त तेजी; ८०० रुपयांचा शेअर आता १२९९ पार, तुमच्याकडे आहे का?
७ ऑगस्ट रोजी तिमाही निकाल जाहीर
कंपनीनं दिलेल्या माहितीनुसार, जून तिमाहीत एकूण निव्वळ नफा २६४ कोटी रुपये होता. जो वार्षिक आधारावर ४८.६० टक्के जास्त आहे. एक वर्षापूर्वी याच तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा १७७.७० कोटी रुपये होता. महसुलाबद्दल बोलायचं झालं तर, मार्च तिमाहीत तो ७२६८.४० कोटी रुपये होता. गेल्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत तो ५५२७.८० कोटी रुपये होता. म्हणजेच वार्षिक आधारावर कंपनीचा महसूल ३१.५० टक्क्यांनी वाढलाय.
टार्गेट प्राईज ७०० रुपये
CNBC TV18 च्या वृत्तानुसार, ब्रोकरेज हाऊस सिटीनं याची टार्गेट प्राईज वाढवली आहे. ब्रोकरेजनं ७०० रुपयांच्या लक्ष्य किंमतीसह BUY रेटिंग दिलं आहे. गेल्या एका वर्षात या कंपनीच्या शेअरच्या किमतीत फक्त ४ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. यातील तज्ज्ञांची मतं त्यांची वैयक्तिक मतं आहेत. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)