पोस्टाच्या 'या' स्कीममध्ये २२०० रुपये जमा करा, पाहा ६० महिन्यांत किती फंड जमा होईल?
पोस्ट ऑफिस सध्या टपाल सेवा तसंच विमा आणि बँकिंग सेवा प्रदान करते.
पोस्ट ऑफिस सध्या टपाल सेवा तसंच विमा आणि बँकिंग सेवा प्रदान करते. बँकिंग सेवांमध्ये, सामान्य बचत खात्यांसह, विविध प्रकारच्या बचत योजनांअंतर्गत खाती देखील उघडतात.
आज आपण आरडी योजनेबद्दल तपशीलवार माहिती घेऊ. तसंच यात दरमहा २२०० रुपये जमा केले तर ६० महिन्यांत किती निधी तयार होईल हे पाहू.
दरमहा आरडी एक निश्चित रक्कम जमा केली जाते. पोस्ट ऑफिस आपल्या ग्राहकांना आरडी योजनेवर वार्षिक ६.७ टक्के व्याज देत आहे.
या योजनेत, तुम्ही किमान १०० रुपये मासिक गुंतवणुकीसह खाते उघडू शकता, तर त्यात कमाल गुंतवणूक मर्यादा नाही.
राजस्थानच्या ताफ्यातील जोफ्रा आर्चरनं २०२५ च्या हंगामात सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध एकही विकेट न घेता ४ षटकात ७६ धावा खर्च केल्या.
जर तुम्ही पोस्ट ऑफिस आरडी खात्यात दरमहा २२०० रुपये जमा केले तर ६० महिन्यांनंतर म्हणजेच मॅच्युरिटीवर तुम्हाला एकूण १,५७,००४ रुपये मिळतील.
या रकमेत तुम्ही जमा केलेले १,३२,००० रुपये आणि २५,००४ रुपयांचे व्याज समाविष्ट आहे. पोस्ट ऑफिस केंद्र सरकारच्या अखत्यारीत येतं. त्यामुळे तुमचे सर्व पैसे त्यात पूर्णपणे सुरक्षित आहेत.
ट्रम्प यांचं टॅरिफ वरदान ठरू शकतो का? कॉर्पोरेट इंडिया म्हणतोय भारत बनू शकतो नवा 'पॉवरहाऊस'